Marathi Bhasheche Sampraday Va Mhani (मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी) By V. G. Apte

No reviews
DictionaryMarathiMarathi GrammarMarathi ProverbsMhani
Rs. 140

(Incl. of all taxes)

Condition
Condition New
Language
Language Marathi
Publisher
Publisher Varada Prakashan
Qty
Only 1 Units Left!
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco-Conscious Packaging
Language Marathi
Book Summary

'डोळे येणे' याचे इंग्रजी काय? 'एरंडाचे गुऱ्हाळ' म्हणजे नेमके काय? वा. गो. आपटे यांचा मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी हा छोटा कोश अशा २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ, आणि बहुतेकांचे इंग्रजी पर्याय, एकाच ठिकाणी देतो.

कै. वासुदेव गोविंद आपटे (१८७१ - १९३०) आनंद मासिकाचे संस्थापक हे मागच्या पिढीतील थोर साहित्यिक होते. त्यांनी १९२२ साली 'शब्द रत्नाकर' हा मराठी - मराठी शब्दकोश तयार केला. वा. गो. आपटे हे 'आंतरभारती' चे पहिले प्रवर्तक होते. त्यांनी अनेक बंगाली कादंबऱ्या मराठीत आणल्या. त्यांनी कुमारांसाठी खूप लिहिले.

'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' हे पुस्तक त्यांनी १९२० साली लिहून प्रसिद्ध केले. ह्या म्हणींच्या व वाक्संप्रदायांच्या छोट्या कोशात एकंदर २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ दिले आहेत. दाते-कर्वे यांच्या कोशासारखा हा सर्वसंग्राहक कोश जरी नसला तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व म्हणींचा व वाक्संप्रदायांचा अर्थ यात सापडेल. पुस्तकाच्या शेवटी वाक्संप्रदायांची व म्हणींची वर्णानुक्रमसूची दिलेली आहे. त्यामुळे 'म्हण' ताबडतोब शोधता येते. स्कॉलरशिप परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हा कोश फारच उपयोगी आहे. मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोश पुन्हा-पुन्हा वाचला पाहिजे.

ह्या कोशाचा दुसरा विशेष म्हणजे २०६६ वाक्संप्रदाय व म्हणींपैकी बहुसंख्य म्हणींचे व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ 'डोळे येणे' याचा इंग्रजी पर्याय 'To have sore eyes' असा दिला आहे. मराठी वाक्संप्रदाय किंवा म्हणी यांचा इंग्रजी अनुवाद करताना अनेकांची त्रेधा-तिरपीट उडते. 'माझे डोळे आले' हे इंग्रजीत लिहिताना 'sore eyes' लिहिण्याऐवजी अनेकजण 'My eyes have come' असे लिहितात! म्हणींचे अर्थ व स्पष्टीकरणे अत्यंत समर्पक दिलेली आहेत. उदाहरणार्थ 'एरंडाचे गुऱ्हाळ' याचा अर्थ 'A Vain Effort' असा दिला आहे.

'मराठी'चे अभ्यासक व विद्यार्थी ह्या कोशाचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे.

Book Details / पुस्तकाची माहिती

  • लेखक / Author: वा. गो. आपटे (Vasudev Govind Apte, 1871–1930)
  • मूळ प्रकाशन / First published: 1920
  • नोंदी / Entries: २०६६ म्हणी व वाक्संप्रदाय, इंग्रजी पर्यायांसह
  • भाषा / Language: मराठी, इंग्रजी पर्यायांसह
  • बांधणी / Format: Paperback
  • प्रकाशक / Publisher: वरदा प्रकाशन, पुणे

In English: A classic 1920 Marathi phrase book by V. G. Apte, founder of the children's magazine Anand. It explains 2,066 Marathi proverbs (mhani) and idioms (sampraday), most with English equivalents, with an alphabetical index for quick lookup. Useful for students, scholarship-exam candidates and translators.

See also: Mhani, Vakysampraday Va Shabdvichar — H. A. Bhave (for Std 1–7)

मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी — वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

Q: या पुस्तकात किती म्हणी आहेत? / How many proverbs?

A: २०६६ म्हणी व वाक्संप्रदाय, अर्थासह आणि बहुतेकांचे इंग्रजी पर्याय.

Q: मराठी म्हणींचे इंग्रजी पर्याय कुठे मिळतील? / Marathi proverbs with English meanings?

A: वा. गो. आपटे यांच्या या कोशात बहुसंख्य म्हणी व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिले आहेत. भाषांतर करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे.

Q: वा. गो. आपटे कोण होते? / Who was V. G. Apte?

A: वासुदेव गोविंद आपटे (१८७१–१९३०) हे 'आनंद' मासिकाचे संस्थापक, कोशकार आणि बालसाहित्यिक होते.

Q: हे पुस्तक कुठे मिळेल? / Where to buy?

A: मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी varadabooks.com वर उपलब्ध आहे. घरपोच डिलिव्हरी मिळते.

Trusted BookstoreBooks selected with care
Secure PaymentsUPI, Cards & trusted payment methods
100% Authentic BooksOriginal books from trusted sources
Need Help?WhatsApp Us