Aani Ti Punha Janmali (आणि ती पुन्हा जन्मली ) By Dipali Ramesh Wadodkar

Regular price Rs. 249.00
Sale price Rs. 249.00 Regular price
Save 0

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खामगांव येथे राहणारे श्री.व सौ.डॉ.वडोदकर म्हणजे माझे आई बाबा ह्यांच्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात मे १९९० मध्ये एक घटना घडली. व्यवसायाने स्त्रीरोगतज्ञ असलेल्या माझ्या आईची दोन्ही मूत्रपिंडं पूर्णपणे निकामी झाल्याचं निदान एखाद्या अचानक आलेल्या वादळासारखं पुढ्यात आलं. त्याकाळी खामगांव येथे यावर काही वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्यामुळे त्या दोघांना सुरुवातीला नागपूर आणि नंतर मुंबईला राहावे लागले. त्याच वर्षी २६ सप्टेंबरला तिचं मूत्रपिंड प्रत्यारोपणाचं ऑपरेशन झालं. या ७ महिन्यांच्या काळात त्यांना किती अडचणी आल्या, त्यांचे चांगले वाईट अनुभव आणि एखादा चमत्कार घडावा अशी अनपेक्षितपणे त्यांना मिळालेली मदत हे सगळं खूप ऐकण्यासारखं, वाचण्यासारखं आहे. या पुस्तकात माझ्या आईच्या आजारपणातील ७ महिने, माझ्या बाबांची तिला मिळालेली साथ आणि सगळे कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या सहकार्याने ऑपरेशन नंतरची ३४ वर्षे तिने तिची तब्येत कशी सांभाळली याबद्दल लिहिले आहे.
या किंवा इतर कुठल्याही आजाराशी झुंज देणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी कठीण परिस्थितीतही आशा सोडू नये हा संदेश माझ्या आईबाबांना या पुस्तकातून द्यायचा आहे.