Aalasavar Mat Kara By H A Bhave
आळस हा मानव जातीचाच मुख्य शत्रू आहे. माणसाची प्रगती होण्यास अडथळा मुख्यतः आळसाचाच असतो. महान माणसांनी आळस दूर ठेवला म्हणूनच त्यांनी महान कार्य केले. आळसाला पळवून लावण्यासाठी पहाटे उठणे व ईश्वरस्मरण करणे याचा उपयोग होतो. चिनी विचारवंत कन्फ्युशिअस म्हणतो की, “हमालासारखे काम करावे व राजासारखे जेवावे.” काम न केल्यामुळे आळशी माणसाचे आरोग्य चांगले रहात नाही. सतत मेहनत हे आळसाविरूध्द तत्व आहे. समाजाच्या दृष्टीने आळशी माणूस संपूर्ण निरूपयोगी आहे. गुन्हेगारीचा जन्म आळशीपणातूनच होतो. सुख व चैन हा सैतानाचा गळ असतो. आळशी माणूस सैतानाचा गुलाम होऊन जातो.
इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी सहाशेपेक्षा जास्त संस्थाने निर्माण केली. ते सर्व संस्थानिक आळशांचे राजे होते. सरकारी नोकरीत आळशीपणा करणाराच कार्यक्षम ठरतो. भिकारी वर्ग हा तर आळशीपणातूनच निर्माण झालेला आहे. आळसामुळे माणूस गंजून जातो. सतत हालचाल हा माणसाचा स्वभाव आहे. आळशी माणसाला काय काम करावे ते सुचतच नाही. जे बहुसंख्य लोक लॉटरी वा रेसच्या मागे लागतात त्यांना आयते धन हवे असते. जुगार किंवा द्यूत हे महाभारतापासून चालू आहेत. श्रम न करता धन मिळवणाऱ्या माणसामध्ये आळसाचाच मोठा अंश असतो. आळशीपणावर मात करण्यासाठी कार्याचे वेड लागले पाहिजे.
८ निवृत्त माणसे जर काम सोडून स्वस्थ बसली तर लवकर मरतात. ' निवृत्ती म्हणजे समाजसेवेची एक संधी आहे.' असे समजून सतत कार्यरत राहिले पाहिजे. रोज काहीतरी उपयुक्त कार्य केल्याशिवाय मी जेवणार नाही असा साधा नियम केला तरी आळसावर मात करता येईल. ज्याला जन्माला आल्याचे सार्थक करायचे आहे त्याने वाटेल ते करून आळसावर मात केलीच पाहिजे ! म्हणून या पुस्तकाचा संदेश एकच आहे तो म्हणजे - ' कार्यवेडे व्हा.' समर्थ रामदासांनी आळस काय-काय अनिष्ट घडवितो ते दासबोधात सांगितले आहे. त्या सर्व ओव्या पाठ कराव्यात इतक्या महत्वाच्या आहेत.