Thagachi Jabani by V S Apte
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Save 0
ठगाची जबानी
पेशवाईच्या अस्ताच्यावेळी या देशात ठगांनी व पेंढाऱ्यांनी धुमकूळ घातला होता. इतका की इंग्रजी राज्यकर्त्यांना त्यांच्या बंदोबस्तासाठी सैन्य ठेवावे लागले !
कर्नल मेडोज टेलरने त्या मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेतला होता. आपल्या “कन्फेशन्स ऑफ ए ठग या कादंबरीच्या प्रस्तावनेत तो लिहितो --
येथे सांगितलेल्या क्रूरपणाच्या आणि गुन्ह्याच्या हकिकती दुर्दैवाने अगदी खऱ्या आहेत. घटनाक्रम नीट जोडण्यापलिकडे मी पदरचे काही घातलेले नाही. या कथानिवेदन करणारा अमीरअल्ली मला सन १८३२ मध्ये भेटला. त्याने ही चित्तप्रक्षोभग हकिकत जशी सांगितली तशीच मी सादर केली आहे व त्या हकिकतीची सत्यता इतरांकडून पडताळून पाहिली आहे. या अमीरअल्लीने सातशे एकोणीस लोकांचा खून केला होता ! "
१८३९ साली प्रसिध्द झालेल्या या कादंबरीने इतिहास निर्माण केला. पूर्वी मराठीत या कादंबरीचा फक्त पूर्वार्ध प्रसिध्द झाला आहे.
संपूर्ण कादंबरी निवेदनरुपाने मराठीत प्रथमच सादर करत आहोत. निवेदन केले आहे, प्रा. वा. शि. आपटे यांनी.