Aanadi Jivan| आनंदी जीवन | By H.A.Bhave
'आनंदी जीवन'
आपण सर्वजण 'आनंदी जीवन' जगायचं स्वप्न पाहतो पण खरा आनंद नेमका कुठे असतो? पैसा, पद की प्रसिद्धीमध्ये की मनःशांतीच्या त्या निःशब्द क्षणात, जिथे आपण स्वतःला भेटतो! या पुस्तकात लेखकाने अत्यंत सोप्या आणि परिणामकारक भाषेत 'आनंदाचं विज्ञान' मांडलं आहे. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी, किती थोडी माणसे, प्रसन्न मन आणि निरोगी शरीर पुरेसं असतं, हे या पुस्तकातून दाखावण्यात आले आहे.
लेखक सांगतात की, 'कामात हमाल व भोजनात राजा' हे सूत्र अंगीकारा आणि शरीर-मन या दोन्ही यंत्रांना योग्य 'तेलपाणी' द्या. अर्थात, 'आनंदी जीवन' हे पुस्तक त्या प्रत्येक वाचकासाठी आहे जो जीवनातील खरा अर्थ शोधत आहे. या ग्रंथात लेखकाने अत्यंत सोप्या पण प्रभावी शब्दांत सांगितलं आहे की आनंद विकत मिळत नाही तर तो घडवावा लागतो आणि आरोग्य, समाधान, प्रेम आणि प्रसन्न मन या चार गोष्टी जपल्या की आयुष्य स्वरं अर्थाने समृद्ध होतं.
समाजात वावरणाऱ्या बहुसंख्य लोकांना कर्ज, स्पर्धा आणि ताण-तणावाच्या या युगात समतोल राखणे शक्य होत नाही आणि त्यात आजच्या धकाधकीच्या जगात संपत्ती साठवण्याच्या प्रयत्नांत सामान्य माणूस हा आनंद हस्वून बसतो, सर्व व्यवहारात, खर्चात आणि आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवेणासा होतो. या जीवनात प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण सामान्य माणूस त्याचा शोध स्वरं तर चुकीच्या ठिकाणी घेत असतो. आपल्याला वाटतं, पैसा मिळाला की आनंद मिळेल पण स्वरं सुख हे मनःशांतीत असतं, द्रव्य-संपत्तीमध्ये नव्हे आणि हाच या पुस्तकाचा मतितार्थ लेखकाने वाचकांसमोर ठेवला आहे.