Sant Dnyaneshwar Maharaj Krut Sarth Shree Amrutanubhav Adhik Sarth Sanvyay Changdev Pashti

2 reviews
Religion & spiritualityDevotional & ReligiousAdultsReligious and Cultural EnthusiastsDevotional and Spiritual Readers
MRP: Rs. 380 Rs. 350 Rs. 30 Off

(Incl. of all taxes)

Condition
Condition New
Language
Language Marathi
Publisher
Publisher Varada Prakashan
Qty
Piracy Free
Express Delivery
Secure Transactions
Eco-Conscious Packaging
Binding Paperback
Language Marathi
Book Summary

ज्ञानेश्वर महाराजांनी शके १२१२ म्हणजे इ.स. १२२० यावर्षी ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण केले. ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य १३ शके १२१० म्हणजेच इ.स. १२३० या दिवशी समाधी घेतली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर समाधी घेण्यापर्यंतच्या काळात म्हणजे शके १२१२ ते शके १२१० या दरम्यान त्यांनी 'अमृतानुभव' हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीत स्वतंत्र विवरण पुष्कळ असले तरी तो ग्रंथ गीतेवरील भाष्य आहे; पण अमृतानुभव हा ग्रंथ त्यांच्या प्रज्ञेचा अगदी स्वतंत्र असा उत्कर्ष आहे. अमृतानुभवात दहा प्रकरणे असून आठशे सहा ओव्या आहेत.
'आकराने लहान पण गुणांनी अत्यंत महान' असा हा ग्रंथ ज्ञानदेवांच्या कुशाग्र बुध्धीचा विलास दाखवतो. 'बोली अरूपाचे रूप दावीन' ही प्रतिज्ञा अमृतानुभवात खरी झाली आहे. अमृतानुभवाच्या पहिल्याच प्रकरणात प्रकृतीपुरूषाचे ऐक्य वर्णन केले आहे. या पायावरच पुढील सर्व ग्रंथाची उभारणी झाली आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी वाङ्मयाचा हिमालय पर्वत समजला तर अमृतानुभव हे त्या हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे. सर्व तीर्थयात्रा संपवून परत आल्यावर ज्ञानदेवांनी हा ग्रंथ लिहिला. अमृतानुभवाचे श्रवण केलेल्या लोकांनी ज्ञानदेवांना 'अकरावा' अवतार मानले यात नवल नाही. अमृतनुभवाच्या रचनेमुळे ज्ञानदेव सिध्धपुरुष आहेत, अशी सर्वाची खातरजमा झाली. या ग्रंथाचा अभ्यास केल्यास तुमच्या अंत:करणात प्रकाशाच्या ज्योती उत्पन्न होून कायम तेवत राहील.ज्ञानेश्वर महाराजांची चांगदेवपासष्टी म्हणजे चांगदेवास उद्देशून लिहिलेल्या पासषट ओव्या आहेत. पण या सर्वच साधक मुमुक्षंना तत्त्वबोध करून देणार्या आहेत. चांगदेवपासष्टीतील पासट ओव्या म्हणजे भागवत धर्माच्या पासट सूत्रेच आहेत. ही सूत्रे अर्थगर्भीत असल्यामुळे त्यातील तत्त्वांचे जास्त स्पष्टीकरण करण्यासाठीच ज्ञानदेवांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली असावी, असा एक तर्क आहे.
चांगदेवपासष्टीमध्ये ज्ञानदेवांचे सर्व तत्त्वज्ञान सूत्ररूपाने आले आहे. या तत्त्वज्ञानाचे विवरण अमृतानुभवात केलेले असल्यामुळे ज्ञानदेवांचे हे दोन्ही ग्रंथ या पुस्तकात एकत्र दिले आहेत.

Sarth Amrutanubhav & Changdev Pasashthi — वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

Q: हे पुस्तक कोणासाठी आहे? / Who is this book for?

A: वारकरी भक्त, अध्यात्मिक साधक आणि ज्ञानेश्वर महाराजांचे तत्त्वज्ञान सखोल समजून घेऊ इच्छिणार्या अभ्यासकांसाठी. Suits Varkari devotees and serious students of Dnyaneshwar Maharaj's philosophy.

Q: या पुस्तकात काय आहे? / What is this book about?

A: यात ज्ञानेश्वर महाराजांचे अमृतानुभव आणि चांगदेवपासष्टी हे दोन्ही ग्रंथ सार्थ (अर्थासह) दिले आहेत. Contains Sant Dnyaneshwar's Amrutanubhav and Changdev Pasashthi with meaning (sarth).

Q: अमृतानुभव आणि चांगदेवपासष्टी म्हणजे काय? / What are Amrutanubhav and Changdev Pasashthi?

A: अमृतानुभव हा ज्ञानदेवांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा ग्रंथ असून, चांगदेवपासष्टी चांगदेवांना उद्देशून लिहिलेल्या पासषट तत्त्वबोधक ओव्या आहेत.

Q: हे पुस्तक कुठे मिळेल? / Where can I buy this book?

A: Sarth Amrutanubhav & Changdev Pasashthi हे पुस्तक varadabooks.com वर उपलब्ध आहे. घरपोच डिलिव्हरी मिळते.

Trusted BookstoreBooks selected with care
Secure PaymentsUPI, Cards & trusted payment methods
100% Authentic BooksOriginal books from trusted sources
Need Help?WhatsApp Us