Vyayaam Dipika by K P Bhagwat

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
लेखकाचा परिचय

जन्म १९१३. शिक्षण पुणे येथील नू.म. विद्यालय, स. प. कॉलेज से मुंबई येथील जी. एस. मेडिकल कॉलेज. फायनल एम.बी.बी.एस. पर्यंत जाऊन काही कारणाने शिक्षणक्रम सोडून दिला. याच शिक्षण मानसशास्त्राची आवड उत्पन्न झाली. १९४४ साली 'आईबाप व मुले' व १९४६ मध्ये 'वैवाहिक जीवन' लिहिले. पहिल्या पुस्तकाची चवथी तर दुसऱ्या पुस्तकाची नववी आवृत्ती निघाली आहे. १९४८ साली टि. म. विद्यापीठात महाराष्ट्रातील पहिले बाल-मार्गदर्शन केंद्र काढले. नंतर ते रिमांड होमला जोडले. १९६२ - १९६४ पर्यंत रमणबागेत असेच केंद्र स्वखर्चाने चालविले. १९४९ मध्ये महाराष्ट्रात मतिमंद मुलांचा पहिला वर्ग काढला. १९५०-१९६१ पर्यंत पुणे विद्यापीठाच्या प्रायोगिक मानसशास्त्र विभागात काम केले व तेथील प्रयोगशाळा सुसज्ज केली. १९५९ मध्ये पुणे येथील शि. प्र. मंडळीस वीस हजार रुपयांची देणगी दिली. १९६१ मध्ये विद्यापीठाचा राजीनामा दिला व मेव्हणे श्री. पंडितराव तुळपुळे यांच्या सहाय्याने 'आनंद एजन्सीज' नावाचा मानसशास्त्रीय उपकरणे बनविण्याचा कारखाना काढला. त्यास सर्व विद्यापीठांचा उत्तम प्रतिसाद आहे. १९८२-१९८३ मध्ये 'शरीर संपदा' व 'शास्त्रोक्त व्यायाम' ही पुस्तके लिहिली. १९८८ साली 'व्यायाम दिपिका' हे पुस्तक लिहिले.