यश म्हणजे काय? यश म्हणजे नुसते द्रव्य मिळवणे नव्हे. यश मिळवूनही मन अतृप्त राहात असेल, जीवाची तगमग संपत नसेल तर त्याला यश म्हणता येणार नाही. खरे सुख-समाधान देणाऱ्या उत्कर्षाचा पाया कसा घालायचा, मिळालेल्या यशाने मन प्रसन्न कसे करायचे हेच या पुस्तकात सांगितले आहे. यशाचे हे नवे रस्ते शुद्ध मार्गाचेच हवे असले पाहिजेत. यावरही भर दिला आहे. जो, समोरचा माणूस ओळखतो, सतत सावध राहतो, कार्यक्षम असतो त्यालाच यशाचे वरदान लाभत असते. यश, प्रथम माणसाच्या मनात तयार होते व नंतर ते प्रत्यक्षात उतरते. म्हणून ज्याला यश मिळवायचे आहे त्याने प्रथम स्वप्ने पहायला शिकले पाहिजे. आणि ती स्वप्ने साकार करण्यासाठी त्याने अथक परिश्रम केले पाहिजेत, हेच या पुस्तकात सांगितले आहे. यशासाठी लहानसहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण कोणती गोष्ट केव्हा उपयोगी पड़ेल हे सांगता येत नाही. नदीचा उगम अगदी छोटाच असतो, त्याप्रमाणे नंतर प्रचंड वाटणारे उद्योग सुरवातीला अगदी छोट्या प्रमाणात असतात. म्हणून सामान्य गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यातूनच मोठे यश लाभू शकते, हेच येथे सांगितले आहे.
वरच्या शीर्षकाचे पुस्तक हे एकच पुस्तक नाही अशी अंदाजे एकशे पन्नास ... मराठी भावानुवादित पुस्तके ह्या पुस्तकाचे लेखक किंवा अनुवादक श्री ह. अ. भावे यांनी लिहिली...ह्या सगळ्या पुस्तकांचे लेखन करण्यामागचा हेतू एकच आणि तो म्हणजे ' यश ' मिळवणे त्यातले पहिलंच पुस्तक हे मानस शास्त्रीय विषयाला धरून आहे..ते पुस्तक म्हणजे ' मन करा रे प्रसन्न 'कोणत्याही क्षेत्रात ' यश ' प्राप्त करून घ्यायचं असेल तर मन नक्कीच प्रसन्न हवं ते कसं प्रसन्न करायचं ते त्यात मिळेलच. अशीच ही सर्व पुस्तके आहेत. की त्यांच्या शीर्षकाप्रमाणे श्री. ह.अ.भावे यांनी त्या पुस्तकात लेखनमांडणी केलेली आहे. त्यापैकीच एक पुस्तक म्हणजे ' यशाची द्वारे ' हे पुस्तक... ते वाचताना एक गोष्ट लक्षात येते, की त्यात अधून-मधून आकर्षक अशा उपशीर्षकांची पेरणी केली आहे आणि त्याखाली त्या उपशीर्षकाशी संबंधित मजकूर.. निरीक्षणाप्रमाणे ; 'प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक आणि त्यात असणारी उपशीर्षके ' हीच इतकी आकर्षक आहेत की ती वाचूनच वाचकाच्या मनाला खालचा मजकूर वाचण्याची मोहिनी पडते.. म्हणजे ह्या पुस्तकातली उपशीर्षके म्हणजे यशाची द्वारे आहेत, ती जसजशी वाचक वाचत जातो तसतशी ती द्वारे उघडत जातात. हाच प्रकार त्यांच्या ह्या सर्वच व्यक्तिमत्वविकास विषयक पुस्तकात आढळून येईल. ज्याला ' जीवनात यश प्राप्त करून घ्यायचं असेल ' त्या प्रत्येकाने श्री.ह.अ.भावे यांचे हे आणि अशी त्यांची बाकीचीही पुस्तके खरंच मनापासून ' वाचली ' तरच यश मिळवणे शक्य होईल.