तानाजी मालुसरे – सिंहगडाचा सिंह
News

तानाजी मालुसरे – सिंहगडाचा सिंह

Sep 29, 2025

तानाजी मालुसरे – सिंहगडाचा सिंह


 मराठा साम्राज्याच्या सुवर्ण इतिहासात तानाजी मालुसरे आणि सिंहगडाची लढाई हे तेजस्वी पर्व आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा ऐतिहासिक आहेत; परंतु त्या गाथा घडवून आणणारे शिलेदार, मावळे आणि त्यांचे नेतृत्व करणारे वीर हेच खरी प्रेरणास्थाने आहेत.

 “गड आला पण सिंह गेला” या वाक्यातून व्यक्त झालेला त्याग आजही अंगावर रोमांच उभे करतो. 

बालपण व पार्श्वभूमी

तानाजी मालुसरे यांचा जन्म कोकणातील उमरतडे गावात झाला. मावळ जातीतील असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना डोंगर, दऱ्या, जंगल यांची सवय होती. त्यांच्यातील धैर्य व कणखर स्वभावामुळे ते लवकरच महाराजांचे विश्वासू झाले. तानाजी हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे सोबती मानले जात. ते लढाऊ प्रवृत्तीचे होते. मावळ्यांच्या नेतृत्वात त्यांना विशेष प्रावीण्य होते. त्यांच्या जीवनात कुटुंबापेक्षा स्वराज्य अधिक महत्त्वाचे होते. हेच पुढे सिंहगडाच्या लढाईत स्पष्ट दिसते.

तानाजी मालुसरे – सिंहगडाचा सिंह

 छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे आधी..बालमित्र, मग..सवंगडी, आणि; मग पुढे शिवाजीराजांचे कायमचेच लढवय्ये सरदार होऊन गेलेले, आणि लोकांनी उत्स्फूर्त मनाने त्यांना ' नरवीर ' अशी पदवी बहाल केलेलं अस्सल मऱ्हाटी व्यक्तिमत्व ' श्री. तान्हाजी काळोजी मालुसरे - उमरखेडकर ' हे जर राजांना लाभलं नसतं तर !! ... छे :...कल्पनाच न केलेली बरी....असो. “मावळ्यांचे धैर्य हे माझ्या साम्राज्याचे खरे सामर्थ्य आहे”– छत्रपती शिवाजी महाराज

सिंहगडाची लढाई – इतिहासाचा सुवर्णक्षण

रणनीती आणि त्याग

१६७० मध्ये महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील सिंहगड जिंकण्याचे ठरवले. हा गड घेणे अशक्य वाटत होते. पण महाराजांनी जबाबदारी दिली तानाजींना. लग्नघर सोडून युद्धासाठी निघालेला तानाजी म्हणाला, “आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’’ त्यांनी मावळ्यांसह गडाच्या कड्यावरून रात्रीच्या अंधारात चढाई केली. शत्रूशी प्राणपणाने लढले. परंतु या लढाईत तानाजी वीरगतीला प्राप्त झाले.

"गड आला पण सिंह गेला"

विजय निश्चित झाला, गड जिंकला गेला. पण छत्रपतींच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. ते म्हणाले, “गड आला पण सिंह गेला”. या एका वाक्यात तानाजींच्या त्यागाचा गौरव दडलेला आहे.

किल्ला जिंकून मावळ्यांनी विजयाचा निशाण फडकवला. पण जेव्हा बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी उद्गार काढले –"गड आला पण सिंह गेला!" या एका वाक्यात तानाजींचे बलिदान, त्यांचे महत्त्व आणि स्वराज्यप्रेम यांचे सार दडलेले आहे.

तानाजी मालुसरे: स्वराज्यासाठी अर्पण झालेले जीवन

भारतीय इतिहासातील प्रत्येक काळ काही विशिष्ट व्यक्तींनी उजळून टाकलेला आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्याप्रमाणे तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते, तर त्यांच्या शूर मावळ्यांनी त्या सूर्याला उजाळा दिला. अशाच मावळ्यांमध्ये एक नाव सदैव घणाघातीपणे घेतले जाते – तानाजी मालुसरे. "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य ऐकले की मराठी माणसाच्या डोळ्यांत पाणी आणि छाती अभिमानाने भरून येते. कारण ते वाक्य केवळ शौर्य नव्हे तर त्याग, कर्तव्य आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे.

सिंहगडाची लढाई: पराक्रमाचा शिखरबिंदू

१६७० मध्ये सिंहगड (त्या काळी कोंढाणा) किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. हा किल्ला पुण्याजवळ असल्यामुळे स्वराज्यासाठी त्याचे विशेष महत्त्व होते. शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत मिळवण्याचे ठरवले.

राजे शिवछत्रपती यांनी औरंगजेबाच्या ताब्यातून जे किल्ले परत मिळवले, त्यापैकी हा एक ' किल्ले सिंहगड '... ह्या किल्ल्याचं पूर्वीचं नाव ' कोंढाणा '... तेही ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या ' कोंढणपूर ' ह्या एका टुमदार खेडेगावावरून पडलेलं. हे सगळे किल्ले परत मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी नवनवीन मोहिमा राजे शिवाजीमहाराज यांना आखाव्या लागल्या. त्यांपैकी सिंहगडची लढाई. छत्रपती शिवाजीराजे यांनी जी कोणी सरदार मंडळी जोडली...त्या प्रत्येकाची मुलाखत किंवा प्रथमपरीक्षा ही...जिजाऊमहाराज स्वतःच घेत असंत, अन् मग बाकीच्या गोष्टी..राजांचे गुप्तहेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचीही निवड प्रथम जिजाऊमहाराजांनी केली आहे, असे संदर्भ आहेत. लढवय्ये मावळे निवडून त्यांची परीक्षा घेणे हे काम..पुण्याच्या विठ्ठलवाडी देवस्थानाच्या आसपासच्या मैदानी परिसरात पार पाडले जाई..असेही संदर्भ आहेत. तर, अश्या माय-लेकाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले हे, सरदार तान्हाजी मालुसरे, शिवाजीराजांनी 'स्वराज्याचा श्रीगणेशा ' केल्यावर राजांच्या बहुतेक मोहिमेत सहभागी होते..असं म्हणणं चुकीचे न ठरावे.

'आगऱ्याहून सुटका' ह्या अचानकपणे आखाव्या लागलेल्या मोहिमेनंतर शिवमाता.. महाराष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांनी एक दिवस ह्या कोंढाणा किल्ल्याकडे नजर वळवली आणि आपले सुपुत्र शिवाजीराजे यांच्याशी महाचर्चा घडवून 'आपल्या पुनवडीजवळ ह्या किल्ल्यावर मुसलमानी सरदार उदयभान याचा मुक्काम नकोच' ह्या धोरणी निर्णयामुळे, हा किल्ला घेण्याची किंवा जिंकून घेण्याची मोहीम आखली गेली..आणि राजांचा जिवलग सखा 'तान्हाजी मालुसरे ' ह्याच्या मनावर ह्या मोहिमेची जबाबदारी सोपवली गेली… आता, त्या शिवकाळात अशा मोहिमांची जबाबदारी एखाद्या खंद्या लढवय्या सरदाराच्या मनावर सोपवणे हा कार्यक्रम भर दरबारात घडत असे त्यासाठी त्या सरदाराने त्याची तोंडी हमी देऊन रितीप्रमाणे तबकात ठेवलेली 'पान सुपारी' किंवा 'विडा' उचलून अथवा स्वीकारला की ' त्या सरदाराने ती मोहिमेची जबाबदारी स्वीकारली ' असे सिद्ध होई मग त्यानंतर मसलतीच्या बैठकी होऊन त्याप्रमाणे मग ' नेमावर धरलेल्या किल्ल्यावर अचानक हल्ला किंवा चढाई होत असे ' त्याप्रमाणे मोहीम पार पडत असे.

ह्याप्रमाणेच, कोंढाणा किल्ला लढवला गेला. त्यावरचा मुघल सरदार हा जरी रजपूत आणि रक्ताने हिंदू असला तरी अखेर मुघलांच्या 'ताटाखालचं मांजरच' होता. 'हा किल्ला जिंकून घेणे' ही जबाबदारी.... वर वर्णन केल्याप्रमाणे सरदार तान्हाजी मालुसरे ह्यांनीआपल्या नेहमीच्या घराचे ' लग्नघरात परिवर्तन ' झालेलं असताना म्हणजेच आपला मुलगा जो 'रायबा' ह्याचं घरात लग्नं होणार असताना देखील, राजांच्या दरबारात बोलावणं आल्यावर तिथे जाऊन 'विडा' उचलून मनावर घेतली होती..आणि त्याप्रमाणे ती पार पाडून कोंढाणा किल्ला जिंकून 'शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या झोळीत' अर्पण केला..पण !!!....हा पण हाच शब्द छत्रपती श्री शिवाजी राजांच्या मनात दुःखाची काळपोकळी निर्माण करून गेला....किल्ल्यावरच्या रात्री उडालेल्या लढाईत.

युद्धाची तयारी

महाराजांनी ही जबाबदारी तानाजींवर सोपवली. त्यावेळी त्यांच्या मुलाचे लग्न ठरलेले होते. पण तानाजी म्हणाले, "माझा मुलगा मोठा झाला तर त्याचे लग्न कधीही होईल, पण गड आत्ताच जिंकला पाहिजे." लग्नाऐवजी ते सरळ मोहिमेस निघाले.

लढाईतील कौशल्य

किल्ल्याची भक्कम तटबंदी पाहून सरळ हल्ला करणे अशक्य होते. तानाजींनी युक्ती लढवली आणि घोरपड "यशवंती" च्या साहाय्याने मावळ्यांनी भिंती सर केल्या. मध्यरात्रीच्या वेळी त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला.

उदयभान राठोडाशी झुंज

मुघलांचा सरदार उदयभान राठोड हा बलाढ्य योद्धा होता. तानाजींनी त्याच्याशी समोरासमोर झुंज दिली. ही झुंज इतकी प्रखर होती की दोघांच्या तलवारी मोडल्या.तानाजींनी शत्रूला पराभूत केले, पण स्वतः युद्धात वीरगतीला प्राप्त झाले. तेथून महाराजांना त्याक्षणीच खुणात्मक तोफेचा बार करून दृश्यनिरोप दाखवला गेला. आणि महाराज गडावर आले....पण, त्यांच्या एका मनाला उदयभान ठार होऊन ' गड जिंकल्याची आनंदवार्ता ' आणि दुसऱ्या मनाला त्या लढाईत ' तान्हाजी ठार झाल्याची दुःखदवार्ता ' एकाचवेळी स्वीकारताना वर्णन करणं जड अशी त्यांची द्विधा मनस्थिती होऊन न कळत त्यांच्या मुखातून " अरेरे ...गड आला .... पण, माझा सिंह गेला !!! " असे उद्गार आणि नेत्रातून अश्रू बाहेर पडले.

तानाजींच्या शौर्यातून मिळणारे जीवनधडे

तानाजींची कथा केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही, ती आजही जीवनाला दिशा देते.

१. कर्तव्य प्रथम: वैयक्तिक सुखापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे.

२. शौर्य व त्याग: खरे नेतृत्व बलिदानातून घडते.

३. युक्तीचे महत्त्व: शौर्याबरोबरच बुद्धीचा वापर आवश्यक.

४. निष्ठा: नेत्याप्रती व ध्येयाप्रती निष्ठा म्हणजेच यशाचा पाया.

५. प्रेरणा: पुढील पिढ्यांना धैर्य शिकवणारा वारसा.