Yashakade Vatchal
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Save 0
ओरिसन स्वेट मोर्डेनच्या " गेटिंग ऑन " या महत्वाच्या पुस्तकाचा हा भावानुवाद आहे. 'चिकाटी आणि चिवटपणा या गुणांमुळेच संकटे दूर होऊ शकतात.' हेच येथे सांगितले आहे. कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर मागे परतायचे दोर, कापून टाकावे लागतात. जो स्वत:चा मार्ग स्वत:च शोधतो, त्यालाच या जगात यश मिळते. तुमचे भाग्यविधाते तुम्हीच असता, यश मिळवण्यासाठी प्रसन्नता, नम्रता, चिकाटी व सतत सावधपणा अशा गुणांची जरुरी असते. हे गुण अंगी कसे बाणवायचे? याचेच मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे. यश मिळवलेली माणसे आपण समाजात पाहतो. परंतु यशाकडची वाटचाल सोपी नसते. या मार्गात काटेकुटेच फार असतात. ही काटेरी मार्गावरील वाटचाल कशी करायची ? याचे बहुमोल मार्गदर्शन या पुस्तकाच्या 25 प्रकरणातून केलेले आहे. ईश्वराने प्रत्येकाला छोटासा तरी गुण दिलेला असतो तो वापरुनच यशाचे द्वार गाठता येते. हे पुस्तक 'तरुणांची गीताच' ठरेल इतके महत्वाचे आहे.