Vishwanath (Purvardha) by Govind Narayan Datarshastri

Regular price Rs. 460.00
Sale price Rs. 460.00 Regular price

विश्वनाथ (पूर्वार्ध व उत्तरार्ध)

-गो. ना. दातार यांच्या सर्वच कादंबऱ्यांप्रमाणे 'विश्वनाथ' ही कादंबरी उत्कंठावर्धक, रहस्यमय व अतर्क्य घटनांनी भरलेली आहे. फक्त कादंबरी ऐतिहासिक नसून सामाजिक आहेव सुमारे २०० वर्षापूर्वी घडली आहे. आईबापांचेछत्र नसलेला विश्वनाथ हा बालक एका तात्यापंतोजीकडेवाढतोव तात्यापंतोजी मृत्यू पावल्यावर त्याच्या डोक्यावरचेछत्र व कुटुंबही त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी नाहीसेहोतेआणि या विस्तीर्ण जगात कोणाचाच आधार नसलेला हा किशोर विश्वनाथ जगाचेअनुभव घेत अनेक ठिकाणी फिरत रहातो. त्याला अनेकदा स्त्रीवेष घ्यावा लागतोकिंवा वेषांतर करावेलागत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यानेभिक्षाही मागितली आहे. त्याच्यावर नाना प्रकारचेप्रसंग ओढवतात आणि त्यातून तोपार पडतो. ही सर्व कादंबरी प्रथमपुरुषी एकवचनी आहे. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगांची व आपल्या प्रवासाची हकिकत विश्वानाथ स्वत:च सांगतो. विश्वनाथ तुम्हाला स्वत:बरोबर देशात नाना ठिकाणी फिरवतो. या चित्तथरारक प्रसंगात त्याला तुरुंगवासही भोगावा लागतो. कादंबरीच्या शेवटी तोम्हणतो, “माझ्या चरित्रातील गुप्तगोष्टी व साहसपूर्ण आत्मवृत्त तुम्हाला कळवून आता ही दीर्घकथा समाप्त करीत आहे.” तुम्हीही त्याच्या जीवनकथेत सामील होऊन सुखदुःखाचेप्रसंग अनुभवू शकाल