Vilas Mandir by Govind Narayan Datarshastri
विकासमंदिर
इतिहास - काळातील राजे व सरदार यांची विश्रांती घेण्याची व विलास करण्याचे खास वाडे बांधलेले असत. त्या वाड्यांनाच विलासमंदिर असे म्हणत. या विलासमंदिरात जी कारस्थाने होत, बेत रचले जात त्याचेच वर्णन या कादंबरीत आहे. म्हणून विलासमंदिर हे सार्थ नाव ठेवले आहे. सध्याच्या राज्यकर्त्याचीही अशी विलासमंदिरे असतात. त्यांना आधुनिक भाषेत 'फार्महाऊस' असे म्हणतात इतकेच. अशा विलासमंदिराभोवती बहुतेक वेळा उपवन किंवा उद्यान केलेले असते. या कादंबरीत राजा नसून इरावती या राणीचेराज्य आहे. कादंबरीची सुरूवातच विलासमंदिर येथून झालेली आहे. कादंबरीतील नावे व वर्णन यावरुन या कादंबरीतील घटना हज़ार वर्षापूवीच्या आहेत असे वाटते. गो. ना. दातार हे स्वतः वैद्य होते. ते आयुर्वेदिक औषधे देत असत. म्हणूनच त्यांच्या कादंबरीत एका वैद्याचे पात्र असतेच. गो. ना. दातारांच्या सर्वच कादंबऱ्याप्रमाणे या कांदबरीतही रहस्यमय घटना आहेत आणि कांदबरीचा शेवट विवाह समारंभाने होतो.