Vikasachi Prerna( विकासाची प्रेरणा ) By H A Bhave
ओरिसन स्वेट मार्डेन (1850 ते 1924) याचे अमेरिकेतील आणि जगभरच्याच हजारो नव्हे, लाखो तरुणात यत्न तो देव जाणावा ही पुरुषार्थ प्रेरणा निर्माण केली. आज जगात जपान अमेरिकेपेक्षाही पुढे आहे जपानने या ओरिसन स्वेट मार्डेनला जणू राष्ट्र गुरुचमानले होते. मार्डेनच्या सर्व पुस्तकांचे अनुवाद जपानमध्ये प्रचंड प्रमाणात खपले आहेत. आपण भारतीय लोक ‘उद्योगिनम् पुरुष सिंहम् उपैति लक्ष्मी:।' हे फक्त सुभाषितात पाठ करतो मार्डेनने त्याचा वस्तुपाठ तरुणांना दिला. निराशा झटकून जीवनात उत्साह निर्माण कसा करायचा हे शिकवले.
सध्या आपल्या देशात शहरीकरणाची प्रक्रिया चालू आहे.खेड्यातील हुशार तरुणाला तेथे फारशी संधी राहिलेली नाही, म्हणून ते सर्व शहरात येतात. कारण शहरात संधी असते. पण शहरात राहाताना खेड्यावरच्या तरुणांना बऱ्याच समस्यांना तोड द्यावे लागते. नवीन व्यवसाय सुरु करायचा तर भांडवलाचा प्रश्न असतो. अशा वेळी तो भांबावतो. पण शहरातच त्याला विकासाची ईश्वरी प्रेरणा मिळते, त्याचे वाचन चांगले असेल तर त्यातून त्याचे चारित्र्य घडते. त्या तरुणाला जे शिक्षण मिळते ते आयुष्याला सुरुवात करुन देणारे असते. पुढची लढाई त्यालाच शहाणपणाने लढावी लागते. त्याच्याकडे विकासाची प्रेरणा असली तरी हा विकास सर्वांगिण व्हायला हवा. या 21 व्या शतकात विकासाच्या कोणत्या प्रेरणा तरुणाकडे असतात हेच या पुस्तकात सांगितले आहे.