Vikasacha Marg (विकासाचा मार्ग ) By H A Bhave

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price

 माणूस आयुष्यभर नाना प्रकारचे उद्योग व धडपड करीत असतो. ही सर्व धडपड तो सुखासाठी करीत असतो. पण 'सुख आणि प्रसन्नता' कशी मिळवायची हे त्याला समजत नाही. त्याच्या मनात नाना प्रकारच्या इच्छा उत्पन्न होत असतात. पण बहुसंख्य माणसांच्या इच्छा, 'हवेतील मनोरेच' ठरतात. आपल्या इच्छा पूर्ण कशा करून घ्यायच्या हे त्याला माहितच नसते. मनातील इच्छापूर्ती केल्याखेरीज विकासाचा मार्ग तुम्हाला मोकळा होत नाही. बहुसंख्य माणसांची इच्छापूर्ती का होत नाही? कारण त्यांना आपल्या अंगी किती सामर्थ्य आहे हेच समजत नाही. इच्छापूर्तीसाठी स्वसामर्थ्य समजले पाहिजे. खरोखर ईश्वराने सर्व माणसांच्या ठायी अपूर्व असे सामर्थ्य ठेवले आहे. फक्त ते अनेक माणसांमध्ये निद्रिस्थ असते. ते जागे केल्याखेरीज तुमची कामे सफल होत नाहीत.
     आपल्या उत्कर्षासाठी जो सतत कार्यरत रहातो तो जणू कर्मयोगीच असतो. कर्मयोग्यालाच कोणी कोणी 'कार्यवेडा' म्हणतात. तुम्ही कर्मयोग्याचे आचरण करीत राहिल्यास यश तुमच्याकडे आपोआप चालत येईल. तरीही यशशिखराकडे जाणारी वाट बिकटच असते. यशाकडची ही वाटचाल सफल व्हावी म्हणून तुम्हाला सतत सावध रहावे लागते. 'अखंड सावधानता' हीच यशाची किंमत असते. तुमच्या अंतरंगात जो ईश्वरी अंश आहे तोच तुम्हाला यश मिळवून देतो. जरूर असते ती, हा ईश्वरी अंश ओळखण्याची. या यशाच्या मार्गावर वाटचाल करताना तुम्हाला अनेक कामे करावी लागतात. या कामातील काही कामे अवघड असतात. तर काही सोपी असतात. माणसाची प्रवृत्ती प्रथम सोपे काम करून टाकण्याची असते. अवघड काम तो बाजुला ठेवतो किंवा करीतच नाही. पण यश मिळवणारा जो ध्येयवादी पुरुष असतो तो प्रथम अवघड कामच हाती घेतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि यश जवळ येते. विकास साधताना शेवटी यश मिळवणे हेच महत्वाचे असते. हे पुस्तक तुम्हाला अंतिम विकासाचा मार्ग निश्चित दाखवेल...