Vijapur Varnan(विजापूरवर्णन) By Sitaram Ramchandra Gaikwad
आजही एखाद्या ऐतिहासिक वास्तूची ओळख करून देण्याच्या कामात, त्या वास्तूच्या परिसरातले वाटाडे किंवा तत्सम गाईडस् हे, त्या वास्तूत ऐतिहासिक काळात निवास करणाऱ्या व्यक्तीचेच जर समर्थक असतील तर, त्या व्यक्तीची, ती तिच्या काळात 'कशीही' वागलेली असली तरीही तिची भलावण करताना आढळतात असे तेव्हाही आढळल्या जाणवल्यामुळे ह्या ग्रंथाचे, 'विजापूर वर्णन ' पुस्तकाचे लेखक किंवा ग्रंथकर्ते 'श्री. सीतारामपंत गायकवाड यांनीच स्वतः 'विजापूर' ह्या ऐतिहासिक प्रसिद्ध शहराची माहिती देणारी संदर्भ पुस्तके, हस्तलिखित दस्तावेज आणि 'खरी माहिती देणारी हुशार वृद्ध माणसे' यांच्या मदतीने हा 'विजापूर वर्णन' नावाचा ऐतिहासिक संदर्भग्रंथ मोठ्या कष्टाने 'सिद्ध' केला आहे.
मोठ्या उत्सुकतेने, आशेने ऐतिहासिक वास्तुंचे दर्शन घेताना पाहुण्यांना त्या वास्तुसंदर्भात खरी माहिती मिळायला हवी. तशी ती त्याला न मिळाल्यास अशा खोट्या माहित्या दिल्यामुळे, मिळाल्यामुळे ऐतिहासिक ज्ञानदाना'च्या बाबतीत, ऐतिहासिक वास्तुला भेट देण्याऱ्या पाहुण्यांची शुद्ध फसवणूक होण्याचा फारच मोठा संभव असतो. यासाठीच केवळ, विजापूरसारख्या कन्नड भाषिक जनतेच्या सहवासात राहूनही सीतारामपंतांनी हे एक सुंदर ऐतिहासिक दाखले देणारे पुस्तक पुरातनकाळी मराठी भाषेत घडविले आणि ते आज तरी दुर्मिळच होते. आणि अशी आज दुर्मिळ होणारी पुस्तके 'खरी' माहिती देण्यासाठी आणि ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी वरदा प्रकाशनाने मनावर घेतले. ते इतिहासाचे विद्यार्थी, संशोधक यांची जिज्ञासा पूर्ण करेल असे वाटते........