Vedantasurya by Dr R C Dhere
बेदान्तसूर्य
'रामविजय', 'हरिविजय', 'पांडवप्रताप' इत्यादी लोकप्रिय ग्रंथाचे कर्ते श्रीधरस्वामी नाझरेकर (शके १५८०-१६५९) हे कल्याणीच्या आनंद संप्रदायाचे अनुगृहीत असूनपंढरीच्या पांडुरंगाचे परमभक्त होते. श्रीधरस्वामींनी प्रचंड ग्रंथ- स्थना करून, वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी पंढरपूर येथे समाधिस्वीकार केला, त्यांनी 'रामविजय' हा प्रख्यात ग्रंथ रचून पूर्ण होताच (श्रावण शु. ७ शके १६२५) 'वेदांतसूर्या' ची रचना आरंभिली आणि अवध्या सहा महिन्यात, माघ शु. ७, • शके १६२५ या दिवशी स्थून पूर्ण केला. श्रीधरस्वामी नाझरेकर हे रसाळ आणि प्रसन्न वाणीचे प्रभू म्हणून प्राचीन मराठी वाङ्गयात प्रख्यात आहेत. रामविजय, 'हरिविजय', 'पांडवप्रताप' आणि 'शिवलीलामृत' हे त्यांचे चार ग्रंथ तर उभ्या महाराष्ट्रामध्ये एवढे लोकप्रिय आहेत, त्यांचे • श्रवण घडले नाही, असा मराठी माणूस विरळाच! 'रामविजय' आणि 'पांडवप्रताप' या दोन ग्रंथांत त्यांनी रामायण व महाभारत या दोन्ही महाकाव्यांचे रसाळ कथांच्या रूपात मराठीत अवतरण घडविले आहे, तर 'हरिविजय' व 'शिवलीलामृत' या दोन ग्रंथात वैष्णव आणि शैव या उभय परंपरांना प्रिय असणान्या पुराण- कथांना मराठी परिवेश दिला आहे.
श्रीधरस्वामींचा 'वेदांतसूर्य हा ग्रंथ विषयदृष्ट्या त्यांच्या सर्व ग्रंथ- संभारात वेगळा आहे. असे वाटते. कारण त्यांनी आपल्या बहुतेक छोटया-मोठया ग्रंथात प्रभूचे लीलागायन केले आहे. तर प्रस्तुत ग्रंथात त्यांनी त्या लीलानायक प्रभूच्या स्वरूपाचे जीव जगत्-जगदीश्वराच्या संबंधाचे तात्विक चिंतन मांडले आहे. परंतु दृश्यतः आणवणारा हा जो भेद आहे, तो प्रत्यक्ष ग्रंथाचे आस्वादन करताना मावळायला लागतो आणि लीलारूप प्रभूचे संकीर्तन जेवढे रोचक आहे, तेवढेच हे तत्त्वरूप प्रभूचे संकीर्तनही रोचक आहे. याचा प्रत्यय येऊ लागतो. अंथनाम आहे 'वेदांतसूर्य ज्याचा उदय होताच सकल मायाजनित अंधकाराचा निरास होतो, तो वेदांतसूर्य अपला सद्गुरु हाच साक्षात सगुण-साकार वेदानसूर्य आहे, अशी ग्रंथकारांची श्रद्धा आहे.