Tatya Urf Ramchandra Pandurang Tope (तात्या उर्फ रामचंद्र पांडुरंग टोपे) By Nayantara Desai
तात्या उर्फ रामचंद्र पांडुरंग टोपे
स्वदेशासाठी झटणे, झगडणे, लढणे, मनापासून लढणे म्हणजे काय हे तात्या उर्फ रामचंद्र पांडुरंग टोपे या १८५७ च्या एका खंद्या सेनानीकडे पाहुन, त्यांचे चरित्र वाचूनच कळेल. त्यांचे मूळ संपूर्ण नांव 'रामचंद्र पांडुरंग भट-येवलेकर' असे होते. ते श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीत फडावर प्रमुख व्यवहारपंडित होते. सुमारे ३० वर्षे तोफखान्यावर अनेक ठिकाणी संस्थानातून काम केल्यानंतर पहिल्या बाजीरावांनी त्यांचे कर्तृत्व बघून एक खाशी टोपी बहाल केली. ती इतकी मौल्यवान आणि रत्नहिऱ्यांनी मढवलेली होती आणि त्यामुळेच त्यांचे नाव ‘टोपे' असे रूढ झाले.
हिंदुस्थानी जनतेवरचे अन्याय सहनशक्तीच्या बाहेर जाऊ लागल्यामुळे फार बोभाटा न करता ब्रह्मावर्त येथे दुसरे नानासाहेब पेशवे यांच्या पदरी नोकरीस असणारे तात्या ‘१८५७ च्या बंडाच्या सेनेचे सेनानी झाले आणि कसलाही गाजावाजा न होता ‘३१ मे १८५७' या दिवशी बंडाचा वणवा हिंदुस्थानभर उफाळला.
पण दुर्दैव असे की 'काही हस्तक उलटले... नाना इंग्रजांना शरण गेले...आणि आपले आई-वडील-मुलगा यांचा विचार बाजूला सारुन, शिवाय पत्नी जानकी हिचे निधन मनाला लावून न घेता हिंदुस्थानाच्या सेवेसाठी लढलेला हा लढवय्या सेनापती अखेर देशासाठी फासावर गेला...!' 'मराठी' म्हणवणाऱ्या नवतरुणांसाठी नयनतारा देसाई यांनी हे कादंबरीकारुप चरित्र लिहिले आहे.