Tanjavarche Marathe Raje (तंजावरचे मराठे राजे) By V S Vakaskar
ऐतिहसिक दुर्मिळ पुस्तक.
दुर्मिळ पुस्तके वाचकांना विशेषतः इतिहास विषयाच्या अभ्यासकांना, संशोधकांना उपलब्ध करून देण्याच्या वरदा प्रकाशनाच्या ध्येय-धोरणाची परम्परा पुढे तशीच चालू रहावी या उद्देशाने आता, 'तंजावरचे मराठे राजे' हे विनायक सदाशिव वाकसकर यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक कष्टाने लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध करीत आहोत. ग्रंथाची अनुक्रमणिका नुसती जरी पाहिली तरी त्यांच्या सखोल अभ्यास-संशोधनाची कल्पना येते. खरे म्हणजे त्यांच्या काळातच त्यांना 'डॉक्टरेट' पदवी द्यायला हवी होती. पण तेव्हा तो योग आला नाही. आमच्या ‘वरदा प्रकाशनातर्फे' हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी ते दुर्मिळच होते. ते आता प्रसिद्ध करण्यामुळे यापुढील इतिहासाच्या चिकित्सक वाचक संशोधक यांना आणखी एक मोलाचा ग्रंथ उपलब्ध होणार आहे. यामुळे आम्हाला समाधान वाटते.