Swamibhakta Khandoballal Chitnis by Nayantar Desai

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price
Save 0

स्वामीभक्त... खंडोबल्लाळ चिटणीस

छत्रपती संभाजीमहाराज,... राजाराम महाराज... आणि नंतर शाहू महाराज... अश्या तीन छत्रपतींच्या काळात आपली स्वामीभक्ती महाराष्ट्रासाठी अर्पण करणारे, फडावर ज्या हाताने आपली लेखणी ज्या हिरिरीने गाजवली, त्याच उजव्या हाताने वेळप्रसंगी तलवारीचा खंडाही रणांगणी गाजवला असे हे 'खंडोबल्लाळ चिटणीस'... हे... शिवाजीमहाराजांचे फडनवीस 'बाळाजी आवजी चिटणीस' यांचे सुपुत्र. त्यांनी संभाजीमहाराजांचे मन जिंकून... फडावर चिटणिस म्हणून महाराष्ट्रसेवा करण्यासाठी उभे राहिले.

ह्या दोन्ही चिटणीस बंधुंपैकी निळो चिटणीस... यांनी फडावरचाच कारभार चोख सांभाळला. पण, खंडोबल्लाळ या त्यांच्या थोरल्या बंधुनी वर उल्लेख केलेल्या तिन्ही छत्रपतींच्या सेवाकाळात अंगभूत धाडसाचा पुरेपूर उपयोग करून ते स्वामिप्रेमास पात्र ठरले. हे नयनतारा देसाई यांनी आपल्या लेखनशैलीतून...ह्या कादंबरीकेत उलगडून दाखवले आहे. प्रत्येक मराठी स्त्री-पुरुषाने, मुलां-मुलींनी ही कादंबरीका वाचावी, संग्रही ठेवावी.