Sursundari | Devangna Ki Nayika |Women Sculptures of Ancient Indian Temples| The Hidden World of Temple Sculptures| Journey Through Devangana Sculptures in Indian Temple Art | Reference Book For Indologist
Sursundari | Devangna Ki Nayika (Marathi Edition)
सुरसुंदरी, देवांगना की नायिका....
भारतातील शिल्प समृद्ध मंदिरांचा प्रवास करताना त्यांवर असलेली नानाविध शिल्प अभ्यासकांना, पर्यटकांना तिथे वारंवार येण्यासाठी भाग पाडतात. वेगवेगळ्या कालखंडामध्ये निर्माण केली गेलेली ही मंदिरे म्हणजे शिल्प-संग्रहालय आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. या शिल्पांमध्ये जशा देव-देवता असतात, तशाच हातांमध्ये वेगवेगळे घटक असलेल्या स्त्रियांची शिल्पे देखील मंदिरात अंतर्बाह्य पाहायला मिळतात. पोपट, माकड यांसोबत असलेली, शस्त्रे घेतलेली, कडेवर मूल असलेली, अंगावर विंचू असलेली, नागाशी लीलया खेळणारी, वाद्य वाजविणारी... अशी अनेक श्रीरूपे मंदिरांवर दिसतात. शिल्पप्रकाश आणि क्षिरार्णव या दोन ग्रंथांमध्ये प्रामुख्याने त्यांची माहिती दिली असली तरी शिल्पांमध्ये दिसणारी विविधता ही नजरेआड करता येणारी नाही. मात्र अनेकदा मंदिरांवर असलेली शिल्पे आणि त्यांची प्राथमिक ग्रंथांत आढळणारी वर्णन यात तफावत दिसून येते. मुळात ही स्त्रीशिल्पे अगोदर निर्माण झाली आणि नंतर ग्रंथ निर्माण झाले हे लक्षात घेतल्यास जेव्हढी स्त्रीशिल्पे निर्माण केली तेव्हढी नावे किंवा त्या स्त्री-शिल्पांमध्ये दिसणारी कृती ग्रंथात नमूद केलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात या स्त्री-शिल्पांचा मागोवा घेताना त्यांच्या निर्मिती मागील संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यांच्या उत्पत्ती ते नामकरण यांचा विचार केला गेला आहे. मंदिरावरील या स्त्रियांचे प्राचीन समाजातील वास्तव प्रतिबिंब आणि त्यांची नावे यांची ग्रांथिक माहिती घेताना भरतमुनी, वात्स्यायन, कालिदास यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेली माहिती आणि नावाच्या बाबतीत लेखकांनी मांडलेली माहिती चिंतन करायला लावणारी आहे. त्यामुळे मंदिरावर असलेल्या या स्त्री-शिल्पांना ओळखणे आता आणखी सोपे होईल हे नक्की!
- गौरव गौर