108 Prasadik Artyancha Paripurna Aarti Sangrah | By Milind Dandawate | १०८ प्रासादिक आरत्यांचा संग्रह | परिपूर्ण आरती संग्रह | Marathi Dharmik Pustake
Smrutichitre (स्मृतिचित्रे) By Laxmibai Tilak
(Incl. of all taxes)
Book Summary
मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल.
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे, या रम्यतेचे, अदभुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढ़ा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल. आचार्य अत्र्यांनी लक्ष्मीबाईना साहित्यलक्ष्मी अशी पदवी दिली ती किती यथार्थ होती हे या पुस्तकावरून कळेल, कितीही कालावधी लोटला तरी लक्ष्मीबाईच्या स्मृतिचित्रांचे अनन्यसाधारण माधुर्य आणि महत्त्व मराठी रसिकांच्या दृष्टीने अबाधित राहिले आहे. जोपर्यंत मराठी भाषा या पृथ्वीवर आहे तोपर्यन्त हे चरित्र घरोघरी वाचले जाईल.