Smaranshakti Kashi Vadhvavi ( स्मरणशक्ती कशी वाढवावी ? ) By V S Apte| marathi improvement motivational book
स्मरणशक्ती कशी वाढवावी ?
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या वैचारिक विकासासाठी उपयुक्त असे हे मार्गदर्शनपर पुस्तक आहे. अभ्यास, करिअर व दैनंदिन जीवनात स्मरणशक्तीचे महत्त्व किती आहे, हे समजावून सांगत विविध शास्त्रीय तत्त्वांवर आधारित उपाय या पुस्तकात सविस्तर दिलेले आहेत. चांगली स्मरणशक्ती ही प्रत्येकासाठी आवश्यक असते; विशेषतः विद्यार्थ्यांसाठी तर ती यशाची किल्ली आहे. परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी स्मरणशक्ती सक्षम आणि सक्रिय ठेवणे किती गरजेचे आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केले आहे.
“स्मरणशक्ती वाढवता येते का?
तिच्या क्षमतेचा विकास कसा करता येईल?
परमेश्वराने दिलेल्या या देणगीचा अधिकाधिक उपयोग कसा करून घ्यावा?”
या सर्व प्रश्नांची वैज्ञानिक पद्धतीने, सोप्या भाषेत दिलेली उत्तरे त्यामुळे हे पुस्तक वैशिष्टयपूर्ण आहे.हे पुस्तक ‘सहा ते साठ’ या सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी, प्रवासी, प्रतिनिधी, अभियंते, डॉक्टर आणि वैचारिक व स्मरणशक्ती-विकासाची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
आपले दैनंदिन कार्य अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी आणि मेंदूची क्षमता उंचावण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.