Shyambhatt by Chintaman Moreshwar Apte
    Regular price
    
        Rs. 200.00
      
    Sale price
    
        Rs. 200.00
      
      Regular price
      
            Save 0
          
                शामभट्ट आणि त्याचा शिष्य बटो
डॉन क्विक्झोट या प्रसिद्ध स्पॅनिश कादंबरीच्या धर्तीवर चिंतामण मोरेश्वर आपटे ह्यांनी ही कादंबरी १८९३ साली लिहून स्वतःच प्रसिद्ध केली. अजूनही ज्योतिषाबद्दल सर्व लोकांना फार आकर्षण वाटते. हे ज्योतिषाचे वेड व अंधविश्वास कसा फोल आहे हे या कादंबरीत विनोदी पद्धतीने दाखवले आहे. या कादंबरीमुळे मनोरंजनही होईल व समाजसुधारणेलाही मदत होईल, अशी आशा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी व्यक्त केली होती. डॉन क्विक्झोटचे भारतीय भाषांतील हे पहिलेच रूपांतर आहे व मराठीतील ही पहिलीच विनोदी कादंबरी आहे. ज्योतिषातील फोलपणा पटवण्यास आजही ही कादंबरी उपयुक्त ठरेल. लेखकाने ही कादंबरी शिवकालात नेऊन ठेवली आहे. शामभट्ट आणि त्याचा शिष्य बटो हे प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांना व रामदासस्वामींनाही भेटतात व रामदासस्वामी शामभट्ट ज्योतिषाला ज्योतिषशास्त्रातील फोलपणा पटवतात व शामभट्ट ज्योतिष सांगण्याचे काम सोडून द्यायचे ठरवतो.
शिवाजीकालीन वातावरण उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. निरनिराळ्या रूढींविरुद्ध लेखकाने जे प्रतिपादन केले आहे, त्यावरून लेखक गोपाळ गणेश आगरकरांचा चाहता किंवा शिष्य असावा असे वाटते. १८९३ नंतर या कादंबरीची पुन्हा आवृत्ती निघालीच नाही. प्रसिद्ध कथालेखक कै. दि. बा. मोकाशी यांची ही आवडती कादंबरी होती. ही कादंबरी पुन्हा एकदा सादर केल्यानंतर रसिक वाचक या कादंबरीचे चांगले स्वागत करतील अशी आशा आहे.