Shree Ram Charitra By C. V. Vaidya

Regular price Rs. 420.00
Sale price Rs. 420.00 Regular price
Save 0
श्रीरामचरित्र यांत प्रथम उपोद्घातांत रामायण ग्रंथाची व रामकथेची थोरवी थोडक्यांत सांगून पुढें वाल्मीकींनीं रामायणांत वार्णलेली रामकथा दिली आहे. गोष्ट व वर्णनें मूळग्रंथांत जशीं आहेत तशच दिलीं असून एक दोन ठिकाणें खेरीज करून बाकीच्या सर्व कल्पना आद्य कवीच्याच आहेत. किंबहुना जागजागी मूळ ग्रंथांतीलच संस्कृत शब्द वापरले आहेत. तात्पर्य, ग्रंथ वाचतांना परिचितांस आपण मूळ रामायणच वाचतों आहों असें वाटेल व अपरिचितांस महाकवीच्या उदात्त कवित्वाची ओळख होईल; ग्रंथाची भाषा होतांहोईतों रसाळ व सुगम ठेवली आहे. ठिकठिकाणी ठळक देऊन ते प्रसंग मनावर चांगले ठसतील अशी तजवीज केली आहे. शेवटी एक लहानसा उपसंहार जोडून त्यांत रामकालीन स्थिति व रामचरित्राचें रहस्य यांचें लहानसें शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकांत सर्व विषय असे घेतले आहेत कीं, ते आबालवृद्ध स्त्रीपुरुषांस मनोरंजक व बोधप्रद व्हावे. सारांश सर्व तऱ्हेनें हें पुस्तक सर्व दर्जाच्या व वयांच्या मराठी वाचकांस गोड व उपयोगी वाटावें असा प्रयत्न केला आहे.