Shradha Theva V Yashsvi Vha श्रद्धा ठेवा व यशस्वी व्हा By H A Bhave

Shradha Theva V Yashsvi Vha (श्रद्धा ठेवा व यशस्वी व्हा ) By H A Bhave

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0
श्रद्धा ही मानसिक गोष्ट आहे. आपल्या कार्यासंबंधी श्रद्धा असेल तर या जगात आश्चर्ये घडू शकतात. बहुसंख्य लोकांची श्रद्धा ईश्वरावर असते. पण ते करीत असलेल्या कामावर नसते. ते म्हणतात, “मी जे काम करीत आहे ते काम म्हणजे बैल जसा तेलाच्या घाण्याभोवती फिरतो तसे निरर्थक व कंटाळवाणे आहे." तुम्ही जे कोणतेही काम करीत आहात ते समाजोपयोगी आहे व त्यातून तुमचे व कुटुंबाचे 'भलेच होणार आहे' अशी श्रद्धा तुम्ही बाळगून तर पहा. अनेकदा शास्त्रज्ञांनी मानवजातीच्या कल्याणाचे जे शोध लावले त्यामागे त्यांची आपल्या कार्यावरील अटळ श्रद्धाच होती.

तुमचे काम कितीही छोटे असो ते श्रद्धापूर्वक करा. ईश्वरावर जितकी श्रद्धा असते तितकी तुमची तुमच्या कार्यावर हवी. अनेक संतांनीसुद्धा हेच सांगितले आहे. संत सावतामाळी म्हणतात, "कांदा-मुळा-भाजी, अवघी विठाबाई माझी" सावतामाळी यांनी 'शेतीच्या कामातच' विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. दर्शन घ्यायला त्यांना 'पंढरपूराला जायची' जरूरी नव्हती. संत सेना न्हावी म्हणतात, 'आम्ही वारिक वारिक । करू हजामत बारिक बारिक ।' सर्व संतांनी आपल्या कार्याबाबतच श्रद्धा बाळगायला सर्वसामान्यांना सांगितले आहे.