Shivryanche Sfurtisthan Rajamata Jijau (शिवरायांचे स्फुर्तिस्थान राजमाता जिजाऊ) By Dr P S Gapatap

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price

प्रस्तुत ऐतिहासिक पुस्तकात राजमाता जिजाऊंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा जिज्ञासुपणे वेध घेतलेला आहे. त्यातून जिजाऊंच्या व शहाजी राजांच्या राजकीय पृष्ठभूमीचे चित्रण केलेले आहे. जिजाऊंचे शिक्षण, बालपण व विवाह या घटनांचा आढावा घेतलेला आहे. त्या काळातील सुलतानशाह्यांच्या क्रूर वागणुकीचा जिजाऊंना मनस्वी तिटकारा येत होता. त्याचा जिजाऊंच्या संवेदनशील मनावर खोलवर परिणाम झाला व त्यातून स्वराज्य निर्माण करण्याची जिजाऊंना प्रबळ इच्छा निर्माण झाली, त्यादृष्टीने त्यांनी बाल शिवाजी राजांच्या मनावर सुरुवातीपासूनच स्वराज्य निर्मितीचे संस्कार रूजविले. पुढे जिजाऊंनी शिवरायांना प्रेरणा देऊन जनहिताच्या दृष्टीने अनेक धाडसी निर्णय घेतले. नि:स्पृह न्यायदान, वतनदारीचे उच्चाटन, स्त्रियांना संरक्षण, इस्लामधर्मात बळजबरीने धर्मांतरीत केलेल्यांचे परत हिंदू धर्मात शुद्धीकरण इ. चा. त्यात समावेश आहे, स्वराज्याच्या शत्रूंचे निर्दालन करण्यासाठी शिवरायांना जागृत करून स्वराज्यावरील अनेक संकटांचा सामना करण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन केले व त्यातून स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.  अशा या स्वराज्याला सार्वभौम राजाची मान्यता मिळविण्यासाठी राज्याभिषेकाचे आयोजन केले. अशारीतीने जिजाऊंच्या मनातील स्वराज्यविषयकच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १७ जून १६७४ रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. असे हे जिजाऊंचे त्यागमय, संक्षिप्त जीवन चरित्र सर्व वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.