Shivrayanchya Swarajyache Shiledar Veer Shivaji Kashid(शिवरायांच्या स्वराज्याचे शिलेदार वीर शिवाजी काशीद)By
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Save 0
शिवरायांच्या अनेक शिलेदारांपैकी नरवीर शिवा काशीद हा एक होय. प्रस्तुत ऐतिहासिक पुस्तकात शिवा काशीदच्या गावाची नैसर्गिक पृष्ठभूमी दिलेली असून त्यानंतर शिवा काशीदच्या अंगी असलेल्या गुण वैशिष्ट्यांचा आढावा घेतलेला आहे. अफजलखानाचा वध, शिवा काशीदचा स्वभाव व कार्यपद्धती विशद केली आहे. त्याचबरोबर खानाच्या वधा नंतरच्या मोहिमेत शिवा काशीदचा सहभाग, पन्हाळ्याचा वेढा व त्यातून शिवाजी महाराजांची सुटका, शिवा काशीदचे बलिदान व स्मृती तसेच त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन इत्यादी प्रसंगांचे यथोचित विवेचन केलेले आहे. वीररत्न शिवा काशीद या प्रकरणात त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. शिवराय हे स्वामिनिष्ठ सेवकांचे पाठीराखे होते हे उदाहरणासहित प्रत्ययास आणलेले आहे. शेवटी पन्हाळगडाची महती, पन्हाळगड ते विशाळगड पायी वारी आणि शिवा काशीदची स्वामिनिष्ठा या विषयांकडे वाचकांचे लक्ष आकर्षित केलेले आहे. यातून शिवाकाशीदच्या शौर्यपूर्ण जीवनाचा वाचकांना प्रत्यय येईल याची खात्री आहे.