Shivarayanche Yuddhakaushalya (शिवरायांचे युद्धकौशल्य) by P S Jagtap

Shivrayanche Yuddhakaushalya (शिवरायांचे युद्धकौशल्य) By P S Jagtap

Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price

आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर अनेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती झाली आहे याचे कारण आहे शिवाजी राजांचे अष्टपैलू लोभस व्यक्तिमत्त्व. महाराजांनी जीवनभर सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या आणि त्यासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित केले. त्यामुळे महाराज आजही त्यांच्या कार्यरूपाने जिवंत आहेत. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य आज युवा पिढीला नवचैतन्य व प्रेरणा देत आहे. युद्ध करून शत्रूला पराजित करणे एवढे त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुरेसे सैन्यबल व युद्धसामुग्री जवळ नसतानादेखील उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून अपुर्‍या सैन्यबलाच्या आधारावर आपले युध्दकौशल्य पणाला लावून अगदी आश्चर्यकारकरित्या त्यांनी आपल्या शत्रूला नामोहरम करण्यात कमालीचे यश प्राप्त केले. त्यापैकी काही प्रसंग म्हणजे फत्तेखानाचा पराभव, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, पावनखिंडीतील रणसंग्राम, उंबरखिंडीत कारतलबखानाची कोंडी, शाइस्ताखानावर छापा. या ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून महाराजांच्या युध्दकौशल्याचे दर्शन होते. येथे महाराजांनी उपयोग केलेल्या युद्धकौशल्याच्या विविध अंगांचा मागोवा घेतला आहे; परंतु युध्दकौशल्याचा संबंध नसलेले प्रसंग येथे दिलेले नाहीत. पहिल्या प्रकरणात शिवरायांच्या युद्धकौशल्याची पार्श्वभूमी विषद केली असून त्यानंतरच्या प्रत्येक प्रकरणात महाराजांच्या विविध युद्धकौशल्यांचे रोमहर्षक ऐतिहासिक घटनांचे विवेचन केले आहे. यामध्ये काही घटनांची पुनरावृत्ती झालेली आहे. परंतु सविस्तर विवेचन करताना त्या गोष्टींची नितांत आवश्यकता वाटत असलेने पुन्हा पुन्हा काही घटना अपरिहार्यपणे आलेल्या आहेत. एका नवीन दृष्टिकोनातून महाराजांच्या अंगी असलेल्या विविध युद्धकौशल्यांचा सूक्ष्मपणे शोध घेतला आहे. याशिवाय गनिमी-कावा युध्दकौशल्यांची वैशिष्ट्ये, शिवरायांचा युद्धविषयक दृष्टिकोन व त्यांच्या कर्तृत्वाच्या विविध पैलूंचा अत्यंत बारकाईने आढावा घेतला आहे. अशा विविध अंगानी युक्त असलेले हे ऐतिहासिक शिवचरित्र शिवप्रेमी वाचकांच्या पसंतीस पात्र होईल याची खात्री आहे.