Shirdiche Shree Saibaba Yanche Charitra by Shree P L Jakka

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Save 0
शिर्डीचे श्री साईबाबा यांचे चरित्र

शिर्डीचे साईबाबा त्यांच्या सर्वधर्म समभावामुळे भारताचे राष्ट्रीय संत झाले आहेत. नेत्यापासून अभिनेत्यापर्यंत हजारो यशस्वी स्त्रीपुरुष साईबाबांचे भक्त बनले आहेत. 14-15 वर्षांतच साईबाबांच्या निर्वाणाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहे. तरीही साईबाबांच्या नावाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. असे का बरे होत आहे? कारण श्री साईबाबांचे सर्व जीवन परदुःख नाहीसे करण्यातच गेले आहे. त्यांच्या जीवनातील क्षण-न-क्षण भक्तांच्या कल्याणासाठीच खर्च होत असे. साईबाबांनी कोणताही ग्रंथ लिहिला नाही, किंवा तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन केले नाही तरीही त्यांचा प्रभाव वाढतच आहे. कारण ते जे जीवन जगले ते आदर्श सत्पुरुषाचे. त्यांचे राहाणे, पोशाख सर्व काही लाखो उपेक्षितांसारखे व पददलितासारखे होते म्हणूनच सर्व थरांतील व सर्व धर्मांतील लोकांना शिर्डीचे साईबाबा आपले वाटतात. त्यांचे 'जीवन हीप त्यांची प्रेरणा होती.