Shauryasindhu Chhatrapati Shahaji Maharaj|Swarajyache Adrushha Shilpakar|शौर्यसिंधू छत्रपती शहाजी महाराज|स्वराज्याचे अदृश्य शिल्पकार| By D.B.Karkare
शौर्यसिंधू छत्रपती शहाजी महाराज
स्वराज्याचे अदृश्य शिल्पकार
शहाजींच्या चरित्राचा संशोधात्मक अभ्यासातून मांडलेला हा ग्रंथ असून तो नव्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज निर्माण करण्याचा काम करतो. प्रस्तुत पुस्तकात मुख्यत्वे शहाजी राजे भोसले यांच्या चरित्राचे मुख्य पैलू मांडले आहेत. शहाजींच्या चरित्रांतील सर्व उपलब्ध माहिती लेखकाने येथे दिली आहे. त्या वेळचे प्रसिद्ध व कर्ते पुरुष व त्यांच्या उलाढाली यांत वर्णिल्या असून. शेवटी शहाजीराजांच्या चरित्राचे मार्मिक विवेचन केले आहे. शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचे बीज शहाजीराजांच्या कर्तबगारीत कसे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शेवटी तंजावरच्या राजघराण्याची माहिती परिशिष्ट रूपाने दिली आहे. तसेच निरनिराळ्या व्यक्तींच्या घराण्यांची माहिती दिलेली असून स्थलांची माहिती सुद्धा येथे काळजीने दिली गेली आहे, आणि ती तितकीच मनोवेधक आहे.
वाचकांना भोसले घराण्याची पूर्वपीठिका व त्यांचा उदेपूरच्या शिसोदे धरण्याशी संबंध आणि इतर विषयीची परंपरागत आलेली सर्व माहिती आणि चिकित्सक पद्धतीची मांडणी या पुस्तकातुन वाचायला मिळेल. इतिहासप्रेमी वाचक, संशोधक, विद्यार्थी आणि शिवचरित्र अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अमूल्य संदर्भग्रंथ ठरतो.
हे पुस्तक वाचताना वाचकाला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील एक विस्मृतीत गेलेला पण अत्यंत निर्णायक अध्यायाची नव्याने ओळख होईल.