Shastriya Paribhasha Kosh (शास्त्रीय परिभाषा कोश) by Yashwant R. Date

Shastriya Paribhasha Kosh (शास्त्रीय परिभाषा कोश) By Yashwant R. Date

Regular price Rs. 1,200.00
Sale price Rs. 1,200.00 Regular price
कुठल्याही विषयाचे शिक्षण मातृभाषेतूनच घ्यायला पाहिजे, हे तत्त्व आता जगमान्य झाले आहे. गेल्या शतकाच्या मध्याला गंगाधर शास्त्री जांभेकर, डॉ. सखाराम अर्जुन वगैरे लोकांनी मराठीत शास्त्रीय विषयावर लिहून व छापून प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. परंतु ती परंपरा टिकली नाही, गेल्या शतकातील मेकॉले याच्या अहवालामुळे देशात सर्वत्र इंग्रजी भाषेतूनच शिक्षण सुरू झाले व देशी भाषांची प्रगती खुंटली. म्हणूनच मराठी ज्ञानकोश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानकोश पूर्ण झाल्यावर लगेचच शास्त्रीय परिभाषा कोशाच्या रचनेचे कार्य हाती घेतले, यात दाते कर्वे प्रमुख होते. हा शास्त्रीय परिभाषाकोश 1948 मध्ये छापून पूर्ण झाला. आता 1990 साल उजाडत आहे तरीही अद्याप शास्त्रीय व तांत्रिक विषय मराठी माध्यमातून शिकविले जात नाहीत. मराठीतून शास्त्रीय व तांत्रिक विषयावर लेखनही फार कमी होते. तेव्हा अशा तन्हेच्या शास्त्रीय परिभाषा कोशाची जरूरी आजही आहेच. या कोशाची योजना अगदी साधी आहे. सर्व शास्त्रीय व तांत्रिक शब्द इंग्रजी आकार विल्हेप्रमाणे दिले आहेत व त्यांचे संस्कृत किंवा देशी भाषेतील समानार्थक शब्द त्या त्या ज्ञानशाखेचे नाव आधी घालून पुढे दिला आहे. ज्यावेळी एका पेक्षा जास्त समानार्थक शब्द उपलब्ध झाले त्यावेळी निवडणाऱ्याला संधी रहावी म्हणून दोन्ही समानार्थक शब्द दिले आहेत. हा कोश तयार करताना कोशकल्यांनी भारतीय भाषांतील निरनिराळ्या कोशांचा तर वापर केलाच पण जरूर तेथे संस्कृतच्या आधारे नवीन शब्दही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा तऱ्हेने या कोशाच्या आधारे शास्त्रीय व तांत्रिक विषयावर सुलभतेने लेखन करता येणे शक्य होणार आहे.

हा शास्त्रीय परिभाषा कोश 'शब्दकोश मंडळ लिमिटेड' च्या वतीने प्रसिद्ध झाला होता. या मंडळाची आर्थिक स्थिती अतिशय खालावल्यामुळे 11 ऑक्टोबर 1948 रोजी भरलेल्या भागीदारांच्या सभेत मंडळ स्वतः ऐच्छिक पद्धतीने विसर्जीत करण्यात यावे असा ठराव करण्यात आला व त्यानुसार कोश मंडळ लिमिटेड ही संस्था विसर्जीत करण्यात आली.

या कोशाने संपूर्ण गरज भागली आहे असे कोशकर्त्यांना वाटत नाही. याहीपेक्षा मोठे कोश रचले जायला हवे होते पण 1948 नंतर तसा प्रयत्न झाल्याचे आढळत नाही. तेव्हा पहिला प्रयत्न म्हणून या शास्त्रीय परिभाषा कोशाचे महत्व अबाधितच राहील. म्हणूनच 'वरदा प्रकाशन प्रा. लि. ने हा कोश पुनर्मुद्रित करून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविले.