Shaliwahan Shak by Govind Narayan Datarshastri

Regular price Rs. 390.00
Sale price Rs. 390.00 Regular price


शालिवाहन शक

गो. ना. दातार यांच्या शैलीनुसार या कादंबरीतील कथानक शालिवाहन शकाच्या आरंभीच घडते आणि हे कथानक प्रतिष्ठान म्हणजे पैठणच्या आसपास घडत असते. यातील कथानक रहस्यमय असून ते किल्ले, भुयारे, राजवाड्यातील कारस्थाने, प्रवास यातून पुढे सरकते. अहिवंत दुर्ग, त्यातील भुयार, अंजनी दुर्ग, रुद्र गढी अशा किल्यातून आणि गढीतून कथानक घडत जाते. प्रत्येक प्रकरणाची रचना अशी केली आहेकी, पुढेकाय होत जाणार याची उत्सुकता सतत वाढत जाते. २००० वर्षापूर्वीच्या कालखंडाचेचित्रण करायचे असल्यामुळे त्यावेळचे वातावरण निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. या कादंबरीत दोन वीरांची द्वंद्व युद्धे आहेत व शंभर कुमारिकांचाही उल्लेख आहे. कादंबरी वाचता वाचता तुमचे मन २००० वर्षापूर्वीच्या कालखंडात रंगून जाते. व चालू जगाचा तुम्हाला विसर पडतो. अशा प्रकारची ही रहस्यमय ऐतिहासिक कादंबरी तुम्हाला श्वास रोखून धरायला लावणारी आहे.