Shaley Marathi Shabdkosh (शालेय मराठी शब्दकोश) By V. S. Apte

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price

वरदा बुक्सने कोशवाङ्मयाचे काम हाती घेतले आहे. त्या धोरणास अनुसरूनच हा कोश सादर करत आहोत. हा कोश विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे. मराठी भाषेतील अनेक शब्दांचा अर्थ मराठीतही स्पष्ट होत नाही म्हणून या कोशाची गरज आहे. यातील शब्द मुख्यतः पाठ्यपुस्तकात येणारे व मुलांना अडणारे असेच निवडले आहेत. शब्दांचे योग्य अर्थ समजावेत यासाठी कोश पाहण्याची सवय विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच लागली पाहिजे. मुलांना सुटसुटीत वाटेल, सहज हाताळता येईल या दृष्टीने कोशाचा आकार मुद्दाम लहान ठेवला आहे. कोशाचे संयोजक व लेखक प्रा. वा. शि. आपटे यांनी दीर्घकाळ शिक्षक व प्राध्यापक म्हणूनच सेवा केली आहे. त्यांच्या तीस-चाळीस वर्षांच्या अध्यापनाचा व व्यासंगाचा अनुभव या कोशामागे आहे. हा कोश विद्यार्थीवर्गात लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री वाटते.