Sarthgitasaptak In Marathi Language| Shrimad Bhagavadgita | Ramgita|Ganeshgita | Shreeshivgita|Shreedevigita | Ashtavakragita By Hari Raghunath Bhagavat
सार्थगीतासप्तक: या गीता सप्तकामध्ये सात गीता आहेत १) श्रीमद्भगवद्गीता -. श्रीमद्भगवद्गीता. ही महाभारतात भीष्मपर्वाच्या आरंभी आली असून ती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली हे सर्वांना माहीत आहेच. तीच गीता या नावाने ओळखली जाते. पण या सारख्या इतरही आणखी सहा गीता आहेत हे फारच थोड्यांना माहीत असते. २) रामगीता -रामगीतेचेही दोन - तीन प्रकार आहेत. ही गीता रामाने लक्ष्मणाला सांगितली आहे व लक्ष्मण प्रश्न करीत आहे अशी कल्पना केली आहे. तीच येथे दिली आहे. येथे दिलेली रामगीता अध्यात्म रामायणाच्या पाचव्या सर्गामध्ये ईश्वर पार्वती संवादात आलेली आहे. ३) गणेशगीता - ही गीता प्रत्यक्ष गणेशाने वरेण्यराजाला सांगितली. वरेण्याने ती व्यासांना सांगितली आणि व्यासांकडून सुताने ऐकली व शौनकाला सांगितली. या गीतेचे अकरा अध्याय आहेत ४) श्रीशिवगीता - ही गीता प्रत्यक्ष शंकरांनी श्रीराम दंडकारण्यात असताना त्याला सांगितली ती स्कंधाने सनत्कुमाराला सांगितली व सनत्कुमारांनी व्यासांना सांगितली. या गीतेचे सोळा अध्याय आहेत. ५) श्रीदेवीगीता - ही गीता देवी अंबेने हिमालयाने प्रश्न विचारल्यावरुन त्याला सांगितली आहे. या गीतेचे नऊ अध्याय आहेत. ६) कपिलगीता - विष्णूने कपिलमुनीचा अवतार घेतला होता तेव्हा त्याने ही गीता देवहूतीला सांगितली. तसेच प्रश्न मैत्रेयमुनीने व्यासांना केले असता जी गीता व्यासांनी सांगितली तीच ही गीता मैत्रेयाने नंतर विदुराला सांगितली. या कपिलगीतेचे नऊ अध्याय आहेत. ७) अष्टावक्रगीता - ही गीता अष्टावक्र ऋषीने जनक राजाने प्रश्न विचारल्यावरून त्याला सांगितली आहे. या गीतेत लहान लहान एकवीस अध्याय आहेत. या सर्व सात गीतांचे मूळ संस्कृत श्लोक व त्यातील प्रत्येक श्लोकाचे यथामूल मराठी भाषांतर या गीतासप्तकात दिले आहे. हे पुस्तक फार दिवस दुर्मिळ होते. ते आता भाविकांना उपलब्ध करुन दिले आहे.