Sarth Dasbodh by HBP L R Pangarkar

Regular price Rs. 300.00
Sale price Rs. 300.00 Regular price
Save 0
सार्थ दासबोध

ग्रंथ कसा असावा याविषयी रामदासांनी दासबोधात उत्तम विवेचन केले आहे. ग्रंथामुळे अवगुण पालटावे, अधोगती चुकावी, गर्व गळावा. रामदास म्हणतात :

इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । परमार्थांसी ।

जेणे परमार्थ वाढे। अंगी अनुताप चढे । भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ।।

जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे | नातरी एकसरें वोळे । मन भगवंती ।

जेणे होय उपरति । अवगुण अवघे पालटती। जेणे चुके अधोगति । त्या नांव ग्रंथ ।।

जेणे धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।

जेणे विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ । ।

जेणे परत्रसाधन । जेणे ग्रंथे होय ज्ञान। जेणे होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ।।

(दासबोध दशक ७ वा, समास ९ वा ओव्या २९ ३४) दासबोध हा ग्रंथ वरील कसोट्यांना पुरेपूर उतरतो यात शंका नाही.