Sarth Subhashitratnakhandmanjusha( सार्थ सुभाषितरत्नखंडमंजुषा )By H A Bhave
पृथिव्यां त्रीणि रत्नानि – जलम्, अन्नम्, सुभाषितम्
“ह्या पृथ्वीवर तीन रत्ने आहेत – पाणी, अन्न आणि सुभाषिते. पण मूर्ख लोक दगडांच्या तुकड्यांनाच ‘रत्नं’ म्हणतात.”
या एका सुभाषितात आपल्या संस्कृतीचं सार सामावलेलं आहे. अन्न आणि पाण्यासारखंच सुभाषितांनाही मानवी जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे, कारण अन्न शरीर पोसतं, तर सुभाषित मन आणि चारित्र्य घडवतं. त्यातून ‘माणूसपण’ आणि ‘जगण्याचं भान’ प्राप्त होतं. प्रत्येक विद्यार्थ्याने जितकी सुभाषिते शिकली, तितकी त्याची विचारशक्ती, संस्कार आणि जीवनदृष्टी परिपक्व होते.
संस्कृत भाषेतील सुभाषितसाहित्य म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. शेकडो वर्षांचं शहाणपण, अनुभव आणि संस्कृती यांचा खजिना. पॅरिसच्या सॉरबॉना विद्यापीठातील संस्कृत प्राध्यापक लुडविक बाख यांनी या खजिन्याने इतके मंत्रमुग्ध झाले की त्यांनी सुभाषितांचा सहा खंड प्रसिद्ध करून अखेर भारतभूमीतच देह ठेवला.जगातील कोणत्याही भाषेत संस्कृत सुभाषितांसारखं अमूल्य वैभव नाही.
‘वरदा प्रकाशन प्रा. लि.’चा हा खरा रत्नसंच ज्ञान, संस्कार आणि प्रेरणांचा अमृतकुंभ.