Samrat Shreeharsh(सम्राट श्रीहर्ष ) By K R Joshi

Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price

ईसवीसन या कालमापनानुसार सातव्या शतकातील ई. सन ६०६ पासून पुढचा ६४७ पर्यंतचा काळ हा 'श्रीहर्ष' अथवा 'हर्षवर्धन' ह्याचा 'राजा' किंवा राजपद भूषविण्याचाकार्यकाल म्हणून मानला जातो. 'श्रीहर्ष आणि हर्षवर्धन ही दोन्ही नावे एकाच व्यक्तीची' असे उल्लेखसंदर्भ उपलब्ध आहेत. मुस्लमान किंवा इस्लामधर्मी राजे लोकांनी भारतावर कब्जा करून आपली राजवट उभारण्यापूर्वी जी भारतीय किंवा हिंदुस्थानी राजघराणी आपले कर्तृत्व गाजवून प्रसिद्धीला आली त्यांपैकी एक घराणे म्हणजे 'वर्धन' घराणे. त्या काळात त्याच्या नावाचा उल्लेख नुसता 'हर्ष' किंवा 'श्रीहर्ष' असा होत नसे, तर 'राजा हर्षवर्धन' असा होत असे. थोडक्यात राजा हर्षाचे 'वर्धन' हे आजच्या काळाप्रमाणे 'आडनाव ' आहे. याच हर्षवर्धन याच्या काळात विद्वान लेखक कवी बाणभट्ट याने ह्या राजाचे 'हर्षचरित' ह्या नावाचे चरित्र लिहिले आहे. साधारणपणे पश्चिम पंजाब (उत्तर प्रदेश), बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिसा ह्या प्रांतांवर श्रीहर्ष किंवा राजा हर्षवर्धन ह्याने आपली सत्ता गाजवली आणि काठेवाड व आसाम येथील राजांनी त्याचे स्वामित्व मान्य केले होते. त्याने स्वतःचा 'संवत' सुरु केला होता आणि तो, ई. सन ६०६ पासून पुढची ३०० वर्ष सुरू होता. हा सम्राट हर्षवर्धन नुसता बलाढ्य राजा नव्हता, तर तो अक्षरसहित्य व वांग्मयकलेचा पुरस्कर्ता असून त्याच्या पदरी बाणभट्ट आणि कवी मयूर यांचा अंतर्भाव होता. याखेरीज तो स्वतःही उच्चप्रतीचा कवी, लेखक आणि नाटककारही होता. हा राजा हिंदू व बौद्ध अश्या दोन्ही धर्माचे पालन करीत असे. दुर्दैवाने त्याला पुत्रसंतान नव्हते, त्यामुळे त्याचे सर्व साम्राज्य त्याच्यानंतर लयाला गेले.याच हर्षवर्धन राजाचे हे पुस्तक श्री. केशव रामचंद्र जोशी यांनी सविस्तर सरलसुंदर लिहिले असून इतिहासाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना व संशोधकांना ते उपयोगी पडेल अशी आशा वाटते.