Sampurna Panchatantra By Ramchandra Chintaman Dhere, H A Bhave

Regular price Rs. 380.00
Sale price Rs. 380.00 Regular price

गेली दोन हजार वर्षे पंचतंत्राने जगभरातील रसिकांना मोहविले आहे. जवळ-जवळ पन्नास भाषांमध्ये भाषांतर झालेला हा मूळ संस्कृत ग्रंथ मूळचा भारतातील. त्यातील प्राण्यांच्या कथा केवळ लहान मुलांसाठीच्या गोष्टी नाहीत, तर त्या व्यावहारिक नीतिशास्त्र शिकवण्यासाठी योजलेली रुपके आहेत.
प्राचीन भारतीय समाजाचे चित्र दूरदर्शनवर पाहावे, तसे प्राणीसृष्टीने गजबजलेल्या या कथांतून पाहाता येते. येथे भेदनीति- प्रविण मंत्री आहेत, जिवाला जीव देणारे मित्र आहेत, चोर आहेत, सुतार आहेत, राजपुत्र आहेत व राजकन्याही आहेत. पण कल्पनासृष्टीत विहरताना जमिनीवरची व्यवहारवादाची पावले मात्र जमिनीवरुन सुटत नाहीत.
अशा या प्राचीन समाजाचे पारदर्शी चित्रण वाचता-वाचता कथानकांची गुंतागुंत तुमची उत्सुकता कायम ठेवते. आजवर मूळ संस्कृत ग्रंथाच्या प्रत्येक शब्दाला न्याय देणारा व त्याबरोबर मुळातील संस्कृत शब्दांची गोडी व रमणीयता प्रकट करणारा मराठी अनुवाद झालेला नव्हता, तो येथे वाचायला मिळाल्यामुळे तुम्ही त्यात गुंगुन जाल. या अजरामर वाङ्मयकृतीची गोडी तुम्हाला चाखायला मिळेल.