Sakharambapu Bhagwant Bokil (सखारामबापू भगवंत बोकील) By Nayantara Desai
पेशवाईतील जी कोणी; व्यवहारनीतिज्ञ मंडळी गाजली त्यातही 'साडेतीन शहाणे' ह्या समाजनिर्मित परिमाणात ज्यांची गणना केली जाते ती व्यक्तिमत्त्वे नावानिशी मोजताना सर्वात प्रथम जे नाव घेतले जाते, ते ‘सखारामबापू बोकिल' यांचे.
वरील शीर्षकातच त्यांचे संपूर्ण नाव दिलेले आहे. तर त्यापैकी एकजण जरी आपली योजना मांडू लागला तरी बाकीच्या अडीच किंवा तीन शहाण्यांनीही जर ती मान्य केली तरच ती अंमलात आणली जाई.
अशा रीतीने ह्या अनेक प्रसंगी एकाचवेळी दोन-दोन धन्यांच्या आज्ञांचे पालन करतांना त्यांना 'तारेवरीची वैचारीक कसरतच' करावी लागे. हे पेशवाईचे अनेक किस्से पाहिल्यास आढळेल. पण त्यापैकीच एकाच प्रखर किश्श्याप्रसंगी त्यांचे हातून नकळत कौटुंबिक म्हणजे पेशवे घराण्याच्या कौटुंबिक प्रकरणात फितुरी घडली आणि ते पेशवाईतील गुन्हेगार ठरले आणि त्यांच्या आयुष्याची अखेर कैदखान्यातच झाली. तो किस्सा म्हणजे नारायणरावांचा खून !साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापूंची पेशवाईतील
श्रीमंत माधवराव (थोरले) आणि श्रीमंत राघोबा (रघुनाथ) ह्या दोन- दोन धन्यांच्या आज्ञाचे पालन करणे हेच त्यांना चक्रव्यूह भासू लागले...कसे? तेच नयनतारा देसाई यांनी आपल्या कुशल लेखनशैलीतून 'सखारामबापूंचे कादंबरी रुपातले चरित्र लिहिताना उलगडून दाखवले आहे. प्रत्येक मराठी तरुणाने आणि तरुणींनीही हे चरित्र मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून वाचणे फार महत्त्वाचे आहे.