Sainikanchya Goshti(सैनिकांच्या गोष्टी )By Meenakshi Vaidy

Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price
Save 0
सैनिक काय करतात? युद्धकाळात त्यांचं आयुष्य कसं असतं? सैनिक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? याबाबत मुलांना गोष्टीरूपाने, काही सैनिकांचं आयुष्य उलगडून दाखवताना सांगितल्या आहेत. मुलांच्या मनात फक्त सिनेमात तीन तासात फायटिंग करणारा हिरो हा खरा हिरो आहे ही प्रतिमा बिंबली जाऊ नये, तसंच देशासाठी खराखुऱ्या शत्रूशी लढणारा सैनिक, युद्ध करताना बरेच महिने झोप- तहान-भूक विसरून शत्रुला नामोहरम करण्यासाठी झटणारा सैनिक 'कसा खरा हिरो असतो' हे मुलांना कळावं तसंच युद्धात सैनिकांचा जीव कोणत्याही क्षणी मृत्यूच्या वाटेवर निघून जाईल हे सांगता येत नाही. तीन तासांनंतर हा हिरो सैनिक, सिनेमातल्या सारखा 'पुन्हा जिवंत होणार नसतो' हे मुलांना कळावं त्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. देशासाठी जिवाची बाजी लावून लढणारा सैनिक, त्यांचे संपूर्ण कुटुंब या काळात कसे जगते! ह्याचं भान मुलांच्या संस्कारशील मनाला व्हावं यासाठी 'सैनिकांच्या गोष्टी' हे पुस्तक लिहिलं आहे.