Rogvikar Mahashabdkosh (रोगविकार महाशब्दकोश) By Prabhakar D. Marathe

Regular price Rs. 160.00
Sale price Rs. 160.00 Regular price
Save 0
रोगविकार महाशब्दकोश या शब्दकोशात ३८७८ रोगांचे स्पष्टीकरण दिलेले आहे.
        आजकाल हजारो रोग विकार व विकृती माणसाला सतत वस्त करत आहेत. यांतील कित्येक रोगांची नांवे सुद्धा सामान्य माणसाला ठाऊक नसतात. मराठी भाषेत रोगांना असलेली अनेक नावे वापरात नाहीत म्हणून माहीत नाहीत. जी नावे माहीत आहेत, परंतु त्याचे इंग्रजी नाव माहीत नाही. रोगाचे माहीत असलेल्या इंग्रजी नावास मराठीत कोणता शब्द आहे याचा पत्ता नाही. रोगी मराठीत काय बोलतो हे डॉक्टरला नीट कळत नाही. डॉक्टर रोग्याला त्याच्या आजाराबद्दल जे काही थोडेफार इंग्रजीतून सांगतो त्याचा नीट अर्थबोधही रोग्याला होत नाही. मग आपल्या आजाराबद्दल डॉक्टरला इंग्रजीतून सांगण्याचा रोग्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होतो, असा सगळा प्रकार आहे.
रोगांची नावे त्यांची इंग्रजी नावे पर्यायी शब्द हे कोणत्याही शब्दकोशांत एकत्रित मिळतील याची खात्री नाही. सामान्य माणसाची ही अडचण दूर व्हावी व सर्वसामान्य माणसापासून विद्यार्थी, वाचक, सुशिक्षित अशा सर्वांनाच उपयुक्त ठरावा, या उद्देशाने हा 'रोगविकार महाशब्दकोश' मी सिद्ध केला आहे.
     हा शब्दकोश म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निव्वळ क्रमिक पुस्तक / संदर्भ ग्रंथ नव्हे; तर सर्वदूर असणाऱ्या लहानसहान गावांत राहणाऱ्या, लिहिता-वाचता येणाऱ्या आणि थोडी उत्सुकता असणाऱ्या, मराठी जाणणाऱ्या प्रत्येक माणसाला या शब्दकोशाचा उपयोग व्हावा, अशाच अपेक्षेने मी या शब्दकोशाचे संपादन केले आहे.
     वाचकांना हा शब्दकोश नेहमीच उपयोगी ठरेल अशी मला आशा वाटते.