Ramayanatil 500 Sarth Sanskrut Subhashite(रामायणातील ५०० सार्थ संस्कृत सुभाषिते)
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Save 0
सार्थ संस्कृत सुभाषिते
पृथिव्यां त्रीणि रत्नानि । जलम् अन्नम् सुभाषितम् ॥ मूढैः पाषाणखण्डेषु । रत्नसंज्ञा विधीयते ॥
ह्या पृथ्वीवर जल, अन्न आणि सुभाषिते अशी तीन रत्ने आहेत. मूर्ख लोक दगडांच्या तुकड्यांनाच रत्नं असे नांव देतात.
वरील सुभाषित ज्यानी रचले त्या कवीच्या मते ह्या पृथ्वीवर पाणी आणि अन्न यांच्या इतकेच महत्व सुभाषितांना आहे. कारण अन्न-पाण्याप्रमाणेच सुभाषितामुळेही माणसाचे चारित्र्य घडते. त्याला 'माणूसपण' प्राप्त होते. आणि त्याबरोबरच 'जगात कसे वागावे' हेही समजते. म्हणून प्रत्येक विध्यार्थी याने जमतील तितकी सुभाषिते जमवून त्यांचा अर्थ आत्मसात केला पाहिजे.
संस्कृत भाषेत, सुभाषितांचे फार मोठे भांडार आहे. साहित्यरत्नांची ती तर खाणच आहे. शेकडो किंवा हजारो वर्षांचे शहाणपण आणि अनुभव ह्या सुभाषितांत साठवलेले आहे. ज्ञानाचा हा प्रचंड साठा अक्षरशः न संपणारा आहे. एकदा ह्या रत्नभांडाराचा पत्ता लागला की, त्यातील ज्ञानवैभव किती लुटावे व किती न्यावे असे होऊन जाते. म्हणूनच की काय, पॅरिस येथील सॉरॉबॉन विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक लुंडविक बाख युरोप सोडून हिमालयाच्या पायथ्याशी येऊन राहिले. सुभाषितांचे सहा 'प्रचंड खंड' प्रसिद्ध केल्यावर त्यांनी भारतातच देह ठिवला.
जगातील कोणत्याही भाषेमधे संस्कृत सुभाषितांसारखे अपूर्व लेणे आढळत नाही. अश ह्या प्रचंड सुभाषितांच्या महासागारातून समुद्रमंथन करून जणू नवनीत रूपानेच ही सुभाषितं गोळा केली आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अमोल ठेवा. 'वरदा प्रकाशन'ने सादर केला आहे.