Rajguru Dadoji Kondadev Ani Chhatrapati Shivaji Maharaj By Nagesh Vinayak Bapat

Rajguru Dadoji Kondadev Ani Chhatrapati Shivaji Maharaj By Nagesh Vinayak Bapat

Regular price Rs. 80.00
Sale price Rs. 80.00 Regular price
Save 0
या पुस्तकांतल्या दोन्ही व्यक्ती चांगल्या इतिहासप्रसिद्ध आहेत. स्वयंप्रकाश सूर्याला जशी मशालीची गरज नाही, तसेच यांच्याविषयी येथे विशेष उल्लेख करण्याचे प्रयोजन नाही. पुस्तक वाचून पाहिल्याबर यात काय आहे ते कळतच आहे. यातील विषय, इतिहास, बखरी, वृद्धपरंपरेने चालत आलेल्या गोष्टी व कित्येक इंग्रजी आणि मराठी ग्रंथ यांच्या आधाराने लिहिला आहे. एवढे मात्र कळविणे भाग आहे की. ‘दादांचा उपदेश' हा अस्सल उपदेश नव्हे, व तसा आपल्या देशांत मिळण्याचा संभवही नाही. शिवाजीमहाराजांच्या अंगी स्वदेशोद्धाराचा अंकुर आहे असे पाहून दादांनी आपल्या अंतकाळी त्यास पुढे उपयोगी पडण्यासारखा उपदेश केला. अशी इतिहासप्रसिद्ध गोष्ट आहे. तोच प्रसंग घेऊन त्याजवर राजेरजवाडे व इतर सर्व लोक यांस उपयोगी पडण्याजोगा हा उपदेश रचिला आहे.