Radheya Karna by V S Vakaskar

Regular price Rs. 160.00
Sale price Rs. 160.00 Regular price
या कर्णचरित्रात विशेषतः कर्णाचे महाभारतात जसे चरित्र आहे तसेच वर्णन केलेले आहे. कर्णासंबंधी जेवढी माहिती मिळाली व कर्णाच्या चरित्रसुत्राला जी उपयुक्त आहे असे वाटले तेवढी सरळ गोष्टीच्या व संवादाच्या रुपाने घेतलेली आहे.

कर्ण स्वतः अत्यंत हीन स्थितीतून उच्च स्थितीत स्वतःच्या कर्तबगारीने चढला होता. या पुस्तकात कर्णाच्या वयाची मर्यादा ठरविण्याचा प्रयत्न करून भारतीय युद्धकाली कर्णाचे वय सत्तर वर्षाचे होते असे यात ठरवले आहे.

या प्रस्तुत कर्णचरित्रात मुख्यतः मानवी व्यक्तीस शक्य अशाच गोष्टी किंवा हकिकती सुसंबद्ध रीतीने दिलेल्या आहेत. तसेच कर्ण ही काल्पनिक व्यक्ती नसून ऐतिहासिक व्यक्ती आहे अशा नात्याने हे चरित्र लिहिले आहे.