Pudhche Paul Pudhecha Taka पुढचे पाऊल पुढेच टाका By H A Bhave
Pudhche Paul Pudhecha Taka पुढचे पाऊल पुढेच टाका By H A Bhave
Pudhche Paul Pudhecha Taka पुढचे पाऊल पुढेच टाका By H A Bhave

Pudhche Paul Pudhecha Taka (पुढचे पाऊल पुढेच टाका) By H A Bhave

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price
Save 0
ओरिसन स्वेट मार्डेन (1850 ते 1924) याने अमेरिकेतील आणि जगभरच्याच हजारो नव्हे, लाखो तरुणात 'यत्न तो देव जाणावा' ही पुरुषार्थ- प्रेरणा निर्माण केली. आज जगात जपान अमेरिकेपेक्षाही पुढे आहे. जपानने या ओरिसन स्वेट मार्डेनला जणू राष्ट्रगुरुच मानले होते. मार्डेनच्या सर्व पुस्तकांचे अनुवाद जपानमध्ये प्रचंड प्रमाणात खपले आहेत. आपण भारतीय लोक 'उद्योगिनम् पुरुषसिंहम् उपैति लक्ष्मी : ।' हे फक्त सुभाषितात पाठ करतो. मार्डेनने त्याचा वस्तुपाठ तरुणांना दिला. निराशा झटकून जीवनात उत्साह  निर्माण कसा करायचा हे शिकवले.
ओरिसन स्वेट मार्डेनचे हे पहिलेच पुस्तक 1894 साली प्रसिद्ध झाले. त्यावेळी ते अतिशय गाजले व अल्पावधीतच या पुस्तकाच्या 100 आवृत्त्या निघाल्या. आता तर 250 आवृत्त्या झाल्या आहेत. या पुस्तकाचे 1ले भाषांतर श्री. यदुनाथ थत्ते यांनी 'आगे बढो' या नाथुराम शुक्ल यांनी अनुवाद केलेल्या हिंदी पुस्तकावरून केले होते. आगे बढो प्रथम 1935 साली प्रसिद्ध झाले. श्री. यदुनाथ थत्ते यांच्या 'पुढे व्हा' या पुस्तकाच्या 7 आवृत्त्या झाल्या. पणं,  त्यात दोन प्रकरणांचा अनुवाद गाळलेला होता. मुळातील 15 प्रकरणांचा व प्रस्तावनेचा संपूर्ण अनुवाद येथे प्रथमच प्रसिद्ध होत आहे. गेल्या 100 वर्षांत ह्या पुस्तकाने हजारो तरुणांना प्रेरणा दिली; व कार्यप्रवृत्त केले. ओरिसन स्वेट मार्डेनच्या सर्व पुस्तकात हे पुस्तक म्हणजे 'मुकुटमणी'च ठरेल. 'समर्थ रामदासां' प्रमाणे, मार्डेन यांनी सांगितलेला प्रयत्नवाद अजूनही दोनशे वर्ष तरुणांना स्फूर्ती देत राहील.