Pratyek Diwas Ek Sandhich( प्रत्येक दिवस दिवस एक संधीच ) By H A Bhave
प्रत्येकाच्या समोर ध्येय असले पाहिजे. स्वप्न प्रत्येकजणच पाहातो. पण ती स्वप्ने साकार होण्याचा दिवस तुमच्या आयुष्यात उजाडावा असे तुम्हाला वाटत असेल तर तोपर्यंतचा प्रत्येक दिवस तुम्ही कार्यरत राहिले पाहिजे. तो सोन्याचा दिवस प्रत्येक दिवशी तुमच्याजवळ येत असतो. प्रत्येक दिवशी तुम्ही जे कार्य कराल ती एक संधीच असते. ती संधी केव्हा येईल हे काहीच सांगता येत नाही. संधी मिळाल्या बरोबर ती लगेच पकडली पाहिजे. संधी पावला-पावला वर असते. माणसाचे भविष्य काही वेळा एका क्षणात ठरते. माणसाला व्यसन मद्याच्या पहिल्या पेल्याबरोबर किंवा सिगरेटच्या पहिल्या झुरक्याबरोबरच लागते. प्रत्येक दिवशी जी संधी मिळते त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही व्यसनमुक्त असले पाहिजे व तुम्हाला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. जी अवघड कामे आहेत. ती प्रथम तुम्ही उरकली पाहिजेत. तरच कोणत्याही दिवशी जी संधी लाभेल ती पटकावण्यासाठी तुम्ही सज्ज राहाल.