Prathamika Vinyan ( प्राथमिक विज्ञान ) By Shreedhar Vyankatesh Ketakar
ज्ञानकोशकार' डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, यांनी १९२७ मध्ये स्वप्रयत्नाने बावीस खंडांचा ज्ञानकोश पूर्ण केला. त्यातील प्रस्तावनाखंडाचा पाचवा विभाग होता 'विज्ञानेतिहास', यामधे १९२२ पर्यंत उपलब्ध झालेला; सर्व विज्ञानाचा इतिहास समाविष्ट केलेला होता. या विभागाची पृष्ठसंख्या ६६० होती. मासिकाच्या आकारातील या ६६० पानात विज्ञानातील अनेक उपविभागांचा इतिहास आलेला होता. वाचकांना सोयीचे जावे म्हणून त्याचे आठ विभाग केले आहेत. व डेमी १/८ - १५०० पानात ते बसवले हे करताना मुळातील एक शद्बही गाळला नाही हे उपविभाग, पुढील प्रमाणे :- - १. प्राथमिक विज्ञान २. वेदविद्या व विज्ञान ३. प्राचीन विज्ञान ४. खगोल शास्त्राचा इतिहास ५. वैद्यक विज्ञानाचा इतिहास ६. रसायनशास्त्राचा इतिहास ७. पदार्थविज्ञान व गणित इतिहास ८. भूशास्त्र व जीवशास्त्र यांचा इतिहास हा सर्व इतिहास लिहिण्यासाठी वापरलेल्या संदर्भगंथाची यादी प्रत्येक उपविभागाच्या शेवटी दिलेली आहे. त्यावरून, या सर्व अभ्यासाची व्याप्ती किती प्रचंड होती हे लक्षात येईल. या विज्ञानेतिहासाच्या विभागाचे आठ उपविभाग पाडणे व त्यांची निरनिराळी सदुसष्ट प्रकरणे तयार करणे हे सर्व काम बुक्स' च्या संपादकीय विभागाने केले आहे. या अशा तन्हेचा सविस्तर विज्ञानेतिहास या पूर्वी मराठीत लिहिला गेलेला नाही. आजपर्यंतचे विज्ञान कसे निर्माण झाले ? याचा सखोल अभ्यास विज्ञानाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. म्हणून विज्ञानेतिहासाचे महत्त्व किती आहे. हे सांगण्याची जरूरी नाही. ज्ञानकोशकार केतकर यांनी आपल्या प्रस्तावनेत या इतिहासात समाविष्ट न झालेल्या उपविषयांची नोंद घेतली आहे. याचाच अर्थ असा की, या विज्ञानेतिहासात आणखी कार्य करायचे बाकी आहे. ते होईल तेव्हा होईल, पण सध्यातरी अत्यंत दुर्मिळ झालेला हा विज्ञानेतिहास सर्वाना सहज उपलब्ध करुन द्यावा या हेतूने विज्ञानेतिहासाच्या विभागाचे प्रकाशन 'वरदा बुक्स' ने हाती घेतले. विज्ञानप्रेमी महाराष्ट्र या उपक्रमाचे स्वागत करील अशी आशा आहे.