Prabhavshali Vyaktimahatvah By H.A.Bhave

Prabhavshali Vyaktimahatvah By H.A.Bhave

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price
Save 0

तुमच्या अंगात कितीही गुण असले तरी, तुमची छापच जर समोरच्या माणसावर पडली नाही, तर तुमच्या अंगातील गुणांचा काही उपयोग होत नाही. तुमची छाप पाडण्यासाठी एक गोष्ट सर्वांनाच करता येण्यासारखी आहे. तुम्ही तुमच्या तनमनाची स्वच्छता राखली पाहिजे. दुसन्यावर छाप पाडण्यासाठी पोशाखालाही महत्त्व आहे. पोशाख भपकेदार व महागच पाहिजे असेही नाही. साधा-स्वच्छ पोशाखसुद्धा प्रभावी ठरू शकतो. 'एकनूर आदमी दसनूर कपड़ा या वचनात अर्थ आहेच. विद्या विनयेन शोभते' असेही एक संस्कृत वचन आहे. त्याप्रमाणेच तुमचे व्यक्तिमत्त्व शिष्टाचार, सौजन्य आणि नम्रता यामुळे उठून दिसते. सौजन्य आणि मधुर वाणी ही प्रयत्नांनी अंगी बाणवता येते. तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनावे यासाठी तुमचे चारित्र्य उच्च असले पाहिजे. उत्तम चारित्र्य, आरोग्यपूर्ण शरीर व नम्रता या गुणांमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक बनेल आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्ही सर्व लोकांना आपल्याकडे खेचून घेऊ शकाल