Plasseycha Ranasangram by D B Mokashi

Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price

Plasseycha Ranasangram by D B Mokashi

पोषा

प्लासीचा रणसंग्राम

कर्नल मेडोज टेलरने " राल्फ डार्नेल" ही कादंबरी सन १८६५ मध्ये लिहिली. १७५७ ची प्लासीची लढाई ही इंग्रज राजवट हिंदुस्थानात स्थिर करणारी मुहूर्तमेढ ठरली. या ऐतिहासिक घटनेचे नाट्यमय प्रसंगानी भरलेले चित्रण मेडोज टेलरने या कादंबरीत केले आहे. सिराजऊद्दोल्याची विचित्र दैवगती हा या कादंबरीचा विषय आहे.

मूळ कादंबरी " राल्फ डार्नेल" अत्यंत दुर्मिळ आहे. त्यावरून ही रंगतदार कादंबरी दि. बा. मोकाशी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून निवेदनरूपाने सादर करत आहेत.

१९व्या शतकातील इंग्रज लेखकानी तत्कालीन समाजाचे चित्रण करणाऱ्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यातील या तीन कादंबऱ्या वरदा बुक्स रसिकाना सादर करत आहे

(१) ठगाची जबानी, लेखन: सन १८३९. लेखक: कर्नल मेडोज टेलर, निवेदकः प्रा. वा. शि. आपटे

(२) प्लासीचा रणसंग्राम !, लेखन: सन १८६५. लेखक: कर्नल मेडोज टेलर, निवेदक: दि. बा. मोकाशी

(३) अनाथ पांडुरंग, लेखन: सन १८२६. लेखक: हॉकली, निवेदक: पां. रा. ढमढेरे