Pariksha Va Abhyas by H A Bhave

Regular price Rs. 50.00
Sale price Rs. 50.00 Regular price
परिक्षा व अभ्यास

विद्यार्थी 'विद्याग्रहण' करतो ते, कोणत्यातरी शास्त्रात किंवा कलेत पारंगत होण्यासाठी. त्यासाठी त्याचे प्रयत्न, यालाच अभ्यास म्हणतात. परन्तु तो पारंगत 'झाला आहे किंवा नाही' हे ठरविण्यासाठी गुरूजन परिक्षा घेतात, म्हणजे विद्यार्थी बहुतकरून परिक्षेसाठी अभ्यास करतात. 'परिक्षेतील गूण' हे अभ्यासासाठी प्रोत्साहन म्हणून असतात. काही लोक केवळ 'ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने' अभ्यास करतात. पण अशा लोकांची टक्केवारी फार कमी असते. म्हणूनच 'परिक्षा व अभ्यास' या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. या दोन्ही गोष्टी या पुस्तकात एकत्रितपणे दिल्या आहेत.

सध्याच्या शैक्षणिक जगात परिक्षांनाच महत्त्व आले आहे. म्हणून या पुस्तकाच्या पहिल्या भागात 'परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे लागेल' याचे विवेचन आहे. परिक्षेचे ठराविक तंत्र असते. ते तंत्र ज्याला जमले त्यालाच परिक्षेत उज्ज्वल यश संपादता येते. सध्याच्या जगात 'परिक्षेतील गुणांनाही' फारच महत्त्व आले आहे, म्हणून; परिक्षेचे तंत्रज्ञान आत्मसात कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन या पुस्तकात सापडेल.